शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही भारतीय नाही का? पाकमुळे भडकलेल्या कपिलदेवचा पत्रकाराला सवाल

By admin | Updated: September 21, 2016 09:34 IST

कबड्डी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानी संघाला निमंत्रण का नाही' असा सवाल एका पत्रकाराने विचारला असता कपिल देव भडकले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - लवकरच सुरू होणा-या कबड्डी वर्ल्डकपच्या पत्रकार परिषदेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलेले माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या रागाचा पार चढला आणि त्याचा फटका एका पत्रकाराला बसला. ' कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाचा समावेश का नाही' असा सवाल एका पत्रकाराने त्यांना विचारला असता ते भडकले आणि त्यांनी ' तुम्ही भारतीय नाही का' असा उलट सवाल केला. भारतीय कबड्डी संघांची घोषणा आणि जर्सीच्या अनावरणासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीच हा प्रकार घडला.  ' जर तुम्ही भारतीय असाल तर असा प्रश्न विचारताच कामा नये. ही काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे का?' अशा शब्दांत कपिल यांनी त्या पत्रकाराला झापले. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्यात एकूण १९ जवान शहीद झाले असून या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासीय संतापले असून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. असे असतानाच एका पत्रकाराने पाकिस्तानी खेळाडूंचा प्रश्न उपस्थित करताच कपिलपाजी संतापले. 
दरम्यान अहमदाबादमध्ये ७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत कबड्डी विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुपकुमार याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. तर मनजीत चिल्लर हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.