योगी आदित्यनाथ यांची 'गुगली', सर्व मुख्यमंत्र्यांना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:44 IST2018-10-27T12:20:04+5:302018-10-27T13:44:01+5:30

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

Yogi Adityanath is most popular CM on Google trends | योगी आदित्यनाथ यांची 'गुगली', सर्व मुख्यमंत्र्यांना टाकलं मागे

योगी आदित्यनाथ यांची 'गुगली', सर्व मुख्यमंत्र्यांना टाकलं मागे

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. योगी आदित्यनाथ हे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार, योगी आदित्यनाथ देशभरातील आजीमाजी मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते या यादीमध्ये अव्वल स्थानीच आहेत. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांची स्टार प्रचारक स्वरुपात निवड करण्यात आली आहे. यादरम्यानच, हे ट्रेंड समोर आले आहेत. ट्रेंडनुसार जवळपास 70 टक्के लोकांनी गुगलवर आदित्यनाथ यांना सर्च केल्याची माहिती समोर आली आहे.  याबाबत उत्तर प्रदेशातील भाजपाचे प्रवक्ते चंद्र मोहन यांनी म्हटले आहे की, कार्यशैलीमुळे योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत. 

हिंदीतही वाचा ही बातमी :

(CM योगी बने गूगल पर सबसे ज्यादा सर्च किए जाने वाले मुख्यमंत्री, जानिए कहां के मुख्यमंत्री नंबर दो पर)

कुठून-कुठून करण्यात सर्वाधिक सर्च ?
केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारच नाही त्रिपुरा, दादरा, नगर हवेली आणि नागालँडमध्ये गुगलवर त्यांना सर्वाधिक सर्च केले गेले. योगी आदित्यनाथ यांची ही लोकप्रियता पाहता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला या सर्वाधिक फायदा मिळेल, असे दिसत आहे.  पाच जिल्ह्यामध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांची स्टार प्रचारक स्वरुपात निवड करण्यात आली आहे. 

शिवराज सिंह चौहान दुसऱ्या क्रमांकावर
दरम्यान, गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. 


 

Web Title: Yogi Adityanath is most popular CM on Google trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.