कोलकाता : त्यांचे वय आज १२0 वर्षे आहे. तसा उल्लेखच त्यांच्या पासपोर्टवर आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध अशी त्यांची गणना करता येईल. त्यासाठी अनुयायांच्या आग्रहामुळे त्यांनी अलीकडेच गिनीज बुककडे अर्जही केला आहे. तब्बल तीन शतके पाहिलेली व्यक्ती असे त्यांचे वर्णन केले जाते. ते आजही रोज योगसाधना करतात. अगदी न चुकता. त्यांचे जेवणही साधेच असते. साध्या उकडलेल्या भाज्या. त्यात तेल आणि मसाल्याचा अंशही नसतो. कधी वरण आणि भात. वरणाला फोडीही नसते. इतक्या वर्षांच्या आयुष्यात कधीही लैंगिक संबंध नाहीत. ब्रह्मश्चर्यावरच त्यांचा पूर्ण विश्वास आहे. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}