शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:08 PM

Sakshi Malik Press Conference: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शेकडो पैलवानांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

Sakshi Malik Press Conference: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती संघटनेबाबत सुरू असलेल्या वादाला बुधवारी नवे वळण मिळाले. आत्तापर्यंत साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत होते. पण, बुधवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर शेकडो पैलवानांनी या तिघांविरोधात आंदोलन सुरू केले. यादरम्यान, साक्षी मलिकने ब्रिजभूषण यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, या लोकांच्या आंदोलनाबद्दल कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. या आंदोलक ज्युनियर कुस्तीपटूंमध्ये बागपतच्या छपरौली येथील 300 जणांचा समावेश आहे. याशिवाय नरेलाच्या वीरेंद्र रेसलिंग अकादमीतूनही काही लोक आले आहेत. एवढंच नाही तर आता आणखी काही पैलवान येणार असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या आंदोलकांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटवर देशाची कुस्ती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.

साक्षी मलिकचे ब्रिजभूषण यांच्यावर आरोपदरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन साक्षी मलिकने ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केला. "ब्रिजभूषण यांचे लोक पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. आमच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या आईला धमकीचे फोन येताहेत. आम्हाला सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे." कुस्ती संघटना करण्यावर साक्षी म्हणाली, "सरकारने नवीन फेडरेशनच्या निलंबनाचे आम्ही स्वागत करतो. फेडरेशनमध्ये संजय सिंह यांचा हस्तक्षेप होता कामा नये. पुन्हा नवीन फेडरेशन आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही."

साक्षी पुढे म्हणते की, "आम्हाला माहित आहे की, ब्रिजभूषण खूप पॉवरफूल आहेत. पण, कोणाशीही न बोलता आपल्या घरात बसून ते नॅशनल गेम्सची घोषणा करतील, असे वाटले नव्हते. आता आमच्यावर ज्युनिअर पैलवानांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप होत आहे. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आमच्यामुळे ज्युनिअर्सचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये, अशी आमची इच्छा आहे," असंही साक्षी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहagitationआंदोलनJantar Mantarजंतर मंतरBJPभाजपा