Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 08:05 IST2025-11-22T08:03:16+5:302025-11-22T08:05:48+5:30
Delhi Air Pollution: वाढती थंडी व दाट धुके यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे.

Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: वाढती थंडी व दाट धुके यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले असून अनेक भागांत हवेची गुणवत्ता ५०० एक्यूआयहून अधिक नोंदली गेली. ही अत्यंत गंभीर पातळी असून काही भागांतील केंद्रात तर एक्यूआय ६०० पार नोंदला गेला. शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतील ही पातळी सर्वाधिक आहे. दिल्लीत वजीरपूर भागात हवेतील प्रदूषण सर्वाधिक म्हणजे ६९१ एक्यूआय एवढे नोंदले गेले.
२ महिने क्रीडा उपक्रम बंद
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच क्रीडा संस्थांना विविध स्पर्धा तसेच शाळांतील क्रीडाविषयक उपक्रम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही आहेत कारणे
वाढलेली थंडी, वाऱ्याचा कमी झालेला वेग आणि त्यात पडलेले धुके यामुळे प्रदूषित जड हवा जमिनीच्या पातळीवर असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.