विश्वचषक भ्रष्टाचारमुक्त होईल - रोनी फ्लॅनगन
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:22+5:302015-02-08T00:19:22+5:30
मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वास आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीचे (एसीएसयू) अध्यक्ष रोनी फ्लॅनगन यांनी व्यक्त केला आहे. तथापि, त्यांनी मॅचफिक्सरवर जोरदार टीकास्त्रही सोडले आहे. आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन करणार्या मॅचफिक्सर यांची तुलना फ्लॅनगन यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्यांशी केली आहे.

विश्वचषक भ्रष्टाचारमुक्त होईल - रोनी फ्लॅनगन
म लबोर्न : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वास आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीचे (एसीएसयू) अध्यक्ष रोनी फ्लॅनगन यांनी व्यक्त केला आहे. तथापि, त्यांनी मॅचफिक्सरवर जोरदार टीकास्त्रही सोडले आहे. आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन करणार्या मॅचफिक्सर यांची तुलना फ्लॅनगन यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्यांशी केली आहे.ते म्हणाले, अशा प्रकारचे काम करताना आम्हाला नेहमीच अशा लोकांविषयी माहिती मिळत असते. ते अतिशय वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. हे मॅचफिक्सर खेळाडू आणि खेळाशी संबंधित अन्य लोकांना प्रभावित करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतील. खेळाडू आणि खेळाशी संबंधितांना जाळ्यात ओढण्यासाठी व त्यांना मजबूर करण्यासाठी, तसेच आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतील. ते बेकायदेशीर सेबाजीसाठी काहीही करू शकतात.ही विश्वचषक स्पर्धा स्पर्धात्मक होईल आणि त्यात संघ आपल्या कौशल्याच्या आधारावर मुकाबला करतील आणि यात काही मर्यादेपर्यंत नशीबही साथ देईल, ही स्पर्धा पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.