अद्भूत, याची देही याची डोळा! आकाशात दिसला गुरु-शनी गळाभेटीचा नजारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 08:58 PM2020-12-21T20:58:02+5:302020-12-21T20:58:46+5:30

Jupiter meets Saturn : नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात आले होते की ते एकमेकांना भेटले असेच वाटत होते.  हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे. लाखो लोकांनी या दोन ग्रहांचे मिलन उघड्या डोळ्यांनी पाहिले.

Wonderful, Jupiter meets Saturn in the evening sky on December 21 | अद्भूत, याची देही याची डोळा! आकाशात दिसला गुरु-शनी गळाभेटीचा नजारा

अद्भूत, याची देही याची डोळा! आकाशात दिसला गुरु-शनी गळाभेटीचा नजारा

Next

आज सायंकाळी सुर्यास्तानंतर आकाशात एक अद्भूत नजारा दिसला. हा योग तब्बल ८०० वर्षांनी जुळून आला होता. सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. 


नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात आले होते की ते एकमेकांना भेटले असेच वाटत होते.  हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे. लाखो लोकांनी या दोन ग्रहांचे मिलन उघड्या डोळ्यांनी पाहिले. तसेच अनेक ठिकाणी दुर्बिनीच्या साह्यानेही हा नजारा अनुभवण्यात आला. जानेवारीमध्ये मकर राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरमध्ये गुरु ग्रह मकर राशीमध्ये आला आहे.


याला ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात गुरु व शनि हे दोन ग्रह यापूर्वी १२२६ आणि १६२३ मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२० रोजी दोन ग्रह कमी अंतरावर येण्याची दुर्मीळ खगोलीय योग आला होता. 


पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळाली आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते. शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करणार आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस किलोमीटर आहे. शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी हे अंतर १.२५ डिग्री होते. 

कन्झिकेशन्स म्हणजे काय ? 
कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात.

 

Web Title: Wonderful, Jupiter meets Saturn in the evening sky on December 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.