शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 8:39 PM

भाजपा आमदाराचं बेताल विधान

भोपाळ: भाजपाचे नेते आणि वादग्रस्त विधानं हे जणू काही समीकरणच झालं आहे. मध्य प्रदेशातील एका भाजपा आमदारानं महिलांना अजब सल्ला दिला आहे. 'महिलांना मुलांना जन्म द्यायचा असल्यास त्यांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं,' असं विधान मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद झाला आहे. मुख्यमंत्री जनकल्याण योजनेअंतर्गत बुधवारी एका कार्यक्रमाला आमदार पन्नालाल शाक्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शाक्य यांनी महिलांना संस्कारी मुलांना जन्म देण्याचा अजब सल्ला दिला. 'महिलांना संस्कारी मुलांना जन्म द्यायला हवा. समाजात विकृती पसरवणाऱ्या मुलांना महिलांनी जन्म देऊ नये,' असं अजब विधान शाक्य यांनी केलं. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्याही पुढे जाऊन, 'संस्कारी मुलांना जन्म देता येत नसेल, तर महिलांना निपुत्रिक राहावं,' असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं. भाजपा आमदार पन्नालाल शाक्य यांना काँग्रेसवर निशाणा साधायचा होता. मात्र काँग्रेसवर टीका करताना त्यांनी महिलांना अजब सल्ला दिला. 'काँग्रेसनं गरिबी हटावची घोषणा दिली होती. मात्र त्यांनी गरिबांनाच संपवून टाकलं. काही महिला अशा असतात, ज्या अशा नेत्यांना जन्म देतात,' असं शाक्य म्हणाले. यानंतर पुढे बोलताना, 'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा. अन्यथा निपुत्रिक राहावं,' असं शाक्य म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार