बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलावर (आरजेडी) थेट निशाणा साधला. 'लालटेन' (आरजेडी)च्या राजवटीत बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता, अशी टीका त्यांनी केली. याच वेळी, नवरात्रकाळाचा मूहुर्त साधत, 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'अंतर्गत राज्यातील ७५ लाख महिलांना मोठे गिफ्ट देखील दिले.
७५ लाख महिलां खूश, खात्यात जमाझाले ₹१०,००० -नवरात्र काळात आपल्याला बिहारच्या नारीशक्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली असे म्हणत, पंतप्रधान मोदी यांनी "आजपासून 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना' सुरू होत असल्याची घोषणा केली. तसेच, या योजनेशी आतापर्यंत ७५ लाख भगिनी जोडल्या गेल्या असून, त्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹१०,००० थेट जमा करण्यात आले आहेत, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, "जेव्हा एखादी बहीण किंवा मुलगी रोजगार किंवा स्वयंरोजगार निर्माण करते, तेव्हा तिच्या स्वप्नांना नवे पंख लागतात आणि समाजात तिचा सन्मान आणखी वृद्धिंगत होतो."
'आरजेडी'वर जोरदार टीका -यावेळी पंतप्रधान मोदींनी आरजेडीवरही थेट हल्ला चढवला. "आरजेडीच्या राजवटीत कुणीही घरातदेखील सुरक्षित नव्हते. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागला आहे. महिलांनी आरजेडी नेत्यांचे अत्याचार पाहिले आहेत. मात्र, नितीश राजवटीत मुली बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरू शकत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी सरकारने उज्ज्वला योजना आणि 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' सारखे अभियान राबवले आहेत. एवढेच नाही तर, महत्वाचे म्हणजे, महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखल्यास त्याचा फायदा समाजाच्या इतर घटकांनाही होतो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
Web Summary : PM Modi inaugurated Bihar's 'Mukhyamantri Mahila Rozgar Yojana,' benefiting 75 lakh women with ₹10,000 deposits. He praised Nitish Kumar's government and criticized RJD's past, highlighting improved women's safety and empowerment under the current administration through initiatives like Ujjwala Yojana.
Web Summary : पीएम मोदी ने बिहार में 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना' का उद्घाटन किया, जिससे 75 लाख महिलाओं को ₹10,000 जमा हुए। उन्होंने नीतीश कुमार सरकार की प्रशंसा की और राजद के अतीत की आलोचना करते हुए, उज्ज्वला योजना जैसी पहलों के माध्यम से महिलाओं की सुरक्षा और सशक्तिकरण में सुधार पर प्रकाश डाला।