दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरीनागपूर : शिव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र एका अनोळखी महिलेने चोरून नेल्याची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत सादिकाबाद मानकापूर येथे घडली. जलजा शशीकुमार नायर (६३) रा. त्रिभुवन, प्लॉट नं. ४०, टीएनटी कॉलनी मानकापूर या मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मानकापूर येथील शिवमंदिरात गेल्या. त्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना एका अनोळखी महिलेने त्यांची नजर चुकवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ३५ हजाराचे मंगळसूत्र चोरून नेले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे..............