कॅन्सरशी झुंजणा-या माझ्या मुलाला इच्छामरण द्या, काळजावर दगड ठेवून आईची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:51 AM2017-09-15T10:51:45+5:302017-09-15T11:15:08+5:30

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एक आई आपल्या मुलाला मरण यावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.

Woman writes to President Kovind seeking permission to euthanise 10yr-old son suffering from cancer, Kanpur | कॅन्सरशी झुंजणा-या माझ्या मुलाला इच्छामरण द्या, काळजावर दगड ठेवून आईची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी 

कॅन्सरशी झुंजणा-या माझ्या मुलाला इच्छामरण द्या, काळजावर दगड ठेवून आईची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी 

Next

लखनौ, दि. 15 - आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, अगदी स्वतःचा जीव देऊ शकते आणि वेळ आल्यास दुस-याचा जीव घेऊदेखील शकते. मात्र उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एक आई आपल्या मुलाला मरण यावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. या आईला परिस्थितीनं निर्दयी होण्यास भाग पाडले आहे. आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने स्वतःच्याच मुलाला मरण यावं, यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची दुर्दैवी वेळ या महिलेवर आली आहे.  कानपूरमध्ये राहणा-या या महिलेचा 10 वर्षांचा मुलगा कॅन्सर रोगाविरोधात झुंज देत आहे. या महिलेनं आपल्या मुलावर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी अनेक हॉस्पिटलच्या खेटा मारल्या आहेत. पण मुलाच्या उपचारांसाठीचा खर्च तिला परवडणारा नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आपल्या मुलाच्या उपचारांचा खर्च करण्यात सक्षम नसल्याचे तिनं सांगितले आहे. 

कॅन्सरशी झुंजणा-या आपल्या मुलाच्या वेदना तिला पाहावत नाहीयेत, मात्र त्या कमी करण्यासाठी तिला अन्य कोणताच मार्ग दिसत नसल्यानं या आईनं काळजावर दगड ठेवून अखेर राष्ट्रपतींकडे मुलासाठी इच्छामरण मागण्याचा निर्णय पक्का केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या आईनं  आपल्या मुलाला इच्छा मरण देण्याची मागणी केली आहे. या पत्रात तिनं असे म्हटले आहे की, मुलाच्या उपचारांचा खर्च अधिक आहे, आर्थिक परिस्थितीमुळे अडथळा येत असल्याने मुलावर उपचार करण्यासाठी मी समर्थ नाही. त्यामुळे कॅन्सरशी झुंजणा-या माझ्या मुलाला इच्छामरण देण्यात यावे. दरम्यान, भारतात इच्छा मरण देणं बेकायदेशीर बाब आहे. अगदी दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्येच इच्छा मरण दिले जाऊ शकते.  
 


Web Title: Woman writes to President Kovind seeking permission to euthanise 10yr-old son suffering from cancer, Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य