शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

महिलेनं उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गनेडीवाला यांना पाठवले दीडशे कंडोम; जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 2:40 PM

जर स्कीनचा स्कीनशी स्पर्श नाही झाला तर तो लैगिक अत्याचार नाही, असा निर्णय एका सुनावणीदरम्यान गनेडीवाला यांनी दिला होता.

ठळक मुद्देस्कीनचा स्कीनशी स्पर्श नाही झाला तर तो लैगिक अत्याचार नाही, असा निर्णय गनेडीवाला यांनी दिला होता.निर्णयाचा विरोध करण्यासाठी एका महिलेनं न्यायमूर्तींना पाठवले कंडोम

गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा व्ही. गनेडीवाला यांना दीडशे कंडोम पाठवले आहेत. लैंगिक शोषणासंदर्भातील दोन प्रकरणांचा निकाल दिल्यानंतर न्यायमूर्ती गनेडीवाला यांच्या नावाची चर्चा झाली होती. अल्पवयीन मुलीचा हात पकडणं आणि तिच्यासमोर एखाद्या पुरुषानं पँटची झिप उघडणं गुन्हा नाही. तसंच अल्पवयीन मुलीच्या छातीवर असलेल्या कपड्यांना स्पर्श करणं हा गुन्हा नाही. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार ठरू शकतो, असा निकाल त्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर अनेक स्तरातून या निकालावर टीका झाली होती.माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेनं त्यांच्या या निकालांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयाच्या पत्त्यावर दीडशे कंडोम पाठवले आहेत. जर स्कीनचा स्कीनशी स्पर्श झाला नाही तर तो लैगिक अत्याचार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून कंडोमचा वापर केल्यावरही स्कीन टच होत नाही, तर हा देखील लैगिक अत्याचार नाही म्हटला जाणार का? असं कंडोम पाठवून त्यांना विचारायचं असल्याचं त्या महिलेनं म्हटलं. यासोबत आपण त्यांना एक पत्रही लिहिलं आहे आणि त्यांच्या निर्णयाचा विरोधही केला आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच न्यायमूर्ती गनेडीवाला यांना निलंबित केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. होऊ शकते कारवाई माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्री कार्यालयानं त्यांच्याकडे असं कोणतंही पाकिट आलं नसल्याचं म्हटलं, तसंच नागपूर बास असोसिएशनचे वकिल श्रीरंग भंडारकर यांनी हा अवमानतेचा खटला असून या कृत्याबद्दल सदर महिलेवर कारवाई केली गेली पाहिजे असंही म्हटलं.शिफारस मागे घेतलीफेब्रुवारी २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायधीश पदी नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती गनेडीवाला यांना जानेवारी २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन केलेल्या कॉलेजिअम द्वारे स्थायी न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. परंतु हा निर्णय समोर आल्यानंतर कॉलेजिअमनं आपली शिफारस मागे घेतली आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ