तीन मुलांसह 'ति'चा प्रियकरासोबत पोबारा; दागिने, पैसे गायब; २० वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:25 AM2021-09-19T11:25:41+5:302021-09-19T11:31:00+5:30

विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

Woman run away with her boyfriend, Jewelry, money missing | तीन मुलांसह 'ति'चा प्रियकरासोबत पोबारा; दागिने, पैसे गायब; २० वर्षांची साथ सोडली

तीन मुलांसह 'ति'चा प्रियकरासोबत पोबारा; दागिने, पैसे गायब; २० वर्षांची साथ सोडली

Next

एस. पी. सिन्हा -

पाटणा
- मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एक विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे. ती आपल्या तिन्ही मुलांसह पळून गेल्याने नवऱ्याने आता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तब्बल २० वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेने घरातून मुलांसह पलायन करताना सर्व दागिने आणि १५ हजार रुपयेही नेले. त्यामुळे घरात चोरी केली आणि मुलांचे अपहरण केले, अशी तक्रार तिच्या नवऱ्याने केली आहे. तो शाळेत नोकरी करतो. मुलांची वये ९, ५ आणि ३ अशी आहेत. पत्नीला माझ्यायासोबत राहायचे नसेल, तर हरकत नाही. पण मुले तरी मला मिळावीत, अशी विनंती नवऱ्याने केली आहे. तो रोज पोलीस ठाण्यात जाऊन मुलांचा तपास लागला का, हे विचारत आहे. नवरा संध्याकाळी परत आला, तेव्हा घर बंद दिसले. 

काय घडले? -
या महिलेचे तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान असलेल्या शेजारी तरुणाशी प्रेम प्रकरण होते. पण शेजारी खूप लहान असल्याने आपल्याला कधी संशयही आला नाही, असे नवऱ्याने सांगितले. आपल्या तिन्ही मुलांचे आधार कार्ड तयार करायचे आहेत, त्यासाठी मी मुलांना घेऊन सरकारी कार्यालयात जाते, असे तिने नवऱ्याला सांगितले होते. नवरा शाळेत गेल्यानंतर ती मुलांसह आणि दागिने, पैसे घेऊन घरातून बाहेर पडली.
 

Web Title: Woman run away with her boyfriend, Jewelry, money missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app