ब्रेकअपनंतर फोटो डिलिट करण्यासाठी प्रियकराचा मोबाइल घेतला, पण गॅलरी बघताच तरुणी हादरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 10:15 IST2023-11-29T10:13:36+5:302023-11-29T10:15:27+5:30

वादानंतर तरुणीने बॉयफ्रेंडच्या मोबाइलमधील स्वत:चे फोटो डिलिट करण्यासाठी त्याचा मोबाइल घेतला होता.

woman found 13000 nude photos of herself and other young women After checking boyfriends mobile phone | ब्रेकअपनंतर फोटो डिलिट करण्यासाठी प्रियकराचा मोबाइल घेतला, पण गॅलरी बघताच तरुणी हादरली!

ब्रेकअपनंतर फोटो डिलिट करण्यासाठी प्रियकराचा मोबाइल घेतला, पण गॅलरी बघताच तरुणी हादरली!

बंगळुरू : एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आपल्या मोबाइलमध्ये गर्लफ्रेंडसह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. वाद झाल्यानंतर सदर तरुणाच्या २२ वर्षीय गर्लफ्रेंडने त्याचा मोबाइल तपासला असता हा प्रकार समोर आला. आदित्य संतोष (वय २५) असं आरोपी तरुणाचं नाव असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  बेलंदूर शहरातील एका खासगी कंपनीतील २२ वर्षीय तरुणीचे तिच्यासोबत काम करणाऱ्या आदित्य संतोष या तरुणासोबत मागील चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला. त्यामुळे तरुणीने आदित्यच्या मोबाइलमधील स्वत:चे फोटो डिलिट करण्यासाठी त्याचा मोबाइल घेतला. मात्र त्यानंतर तिला मोठा धक्का बसला. कारण आदित्य याच्या मोबाइलमध्ये तिच्यासह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो होते. 

हा प्रकार समजल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने याबाबत आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली. तसंच कंपनीतील इतर तरुणींच्या बाबतीत असा प्रकार होऊ नये, म्हणून आदित्य संतोष याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीनंतर कंपनीच्या वरिष्ठांनी २३ नोव्हेंबर रोजी आदित्य संतोष याच्याविरोधात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. 
 

Web Title: woman found 13000 nude photos of herself and other young women After checking boyfriends mobile phone