शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 11:20 AM

'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.अमूल्या लियोना असं तरुणीचं नाव असून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली.14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बंगळुरू - एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. बंगळुरुमधील सीएएविरोधी मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ओवेसी आणि संयोजकांना मोठा धक्का बसला होता. 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

अमूल्या लियोना असं 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीचं नाव असून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या अमूल्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. न्यायालयात हजर केलं. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूल्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी मंचावर घडलेला या घटनेचा निषेध केला आहे. 

ओवेसी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी तेथे ही तरुणी देखील उपस्थित होती. कार्यक्रमाच्या मध्यभागी ती तरुणी स्टेजवर पोहोचली आणि माईकवर पाकिस्तान झिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी ओवेसी स्वत: या तरुणीला रोखण्यास सरसावले त्यानंतर तिने 'हिंदुस्थान झिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली. 

'हिंदुस्थान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद यात फरक आहे' असं ती तरूणी माईकवर बोलत होती. मात्र तिथल्या आयोजकांनी तिच्याकडून माईक हिसकायचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. हा संपूर्ण प्रकार पाहून ओवेसी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्वरित त्यांनी स्पष्टीकरण दिले. 'ही सीएएविरोधी रॅली आहे. शत्रू देशाच्या बाजूने कोणत्याही घोषणेचे समर्थन केले जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. हे खूप चुकीचे आहे. आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील' असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला

China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

खुशखबर ! मार्चमध्ये स्वस्त होऊ शकतो घरघुती गॅस सिलेंडर; मागील 4 महिन्यांपासून होतेय दरवाढ

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीArrestअटकPoliceपोलिसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन