शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांची वीरचक्रसाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 8:56 PM

नवी दिल्ली - पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  यांना वीर ...

नवी दिल्ली - पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  यांना वीर चक्र देण्यात यावे अशी शिफारस हवाई दल केंद्र सरकारकडे करणार आहे. दरम्यान, अभिनंदन हे कर्तव्यावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातून बदली करण्यात आली आहे.  त्यांना पश्चिम विभागातील  एखाद्या महत्त्वपूर्ण हवाई तळावर नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.   

पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यांनी गाजवलेल्या मर्दुमकीसाठी वीर चक्र देण्यात यावे, अशी शिफारस हवाई दलाकडून करण्यात येणार आहे. 

 

विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीबाबत माहिती देताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीचे पत्रक तयार कण्यात आले आहे. लवकरच श्रीनगर हवाई तळावरून नव्या ठिकाणी पाठवण्यात येईल.'' अभिनंदन यांच्या बदलीच्या ठिकाणाचा उलगडा करण्यात आला नसला तरी त्यांना हवाई तळावरच नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच विमान उडवण्यासाठी ते सक्षम आहेत, हे सिद्ध झाल्यास त्यांना विमान उड्डाण करण्याची परवानगीही देण्यात येणार आहे. 

27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या कचाट्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने पाकिस्तानवर जगभरातून दबाव आणला. यानंतर 1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झाले होते. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक