"तुमचं 'सॉरी' माझा पोटचा गोळा परत आणेल का?" द्वारका हिट अँड रन प्रकरणातील पीडित मातेचा काळजाला भिडणारा सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:03 IST2026-02-18T15:01:51+5:302026-02-18T15:03:28+5:30

भरधाव कारने चिरडलेल्या साहिल धनेश्राच्या मृत्यूनंतर आरोपीच्या वडिलांनी जाहीर माफी मागितली, मात्र मुलाच्या विरहाने होरपळलेल्या मातेने ही माफी झिडकारली आहे.

"Will your 'sorry' bring back my son?" Heartbreaking question from the mother of the victim in the Dwarka hit-and-run case! | "तुमचं 'सॉरी' माझा पोटचा गोळा परत आणेल का?" द्वारका हिट अँड रन प्रकरणातील पीडित मातेचा काळजाला भिडणारा सवाल!

"तुमचं 'सॉरी' माझा पोटचा गोळा परत आणेल का?" द्वारका हिट अँड रन प्रकरणातील पीडित मातेचा काळजाला भिडणारा सवाल!

"एका 'सॉरी'ने माझा मुलगा परत येईल का? ज्या मुलाच्या आधाराने मी पतीच्या निधनानंतर आयुष्य सावरलं, तोच मुलगा तुम्ही हिरावून घेतला. आता तुमची माफी मला कशासाठी हवीय?" हा आर्त टाहो आहे दिल्लीतील द्वारका भागात झालेल्या भीषण 'हिट अँड रन' अपघातात आपला २३ वर्षांचा मुलगा गमावलेल्या इन्ना माकन यांचा. भरधाव कारने चिरडलेल्या साहिल धनेश्राच्या मृत्यूनंतर आरोपीच्या वडिलांनी जाहीर माफी मागितली, मात्र मुलाच्या विरहाने होरपळलेल्या मातेने ही माफी झिडकारली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काय आहे हे हृदयद्रावक प्रकरण?

३ फेब्रुवारी रोजी द्वारका परिसरात एका भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या साहिलला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात साहिलचा तडफडून मृत्यू झाला. गाडी चालवणारा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली होती. आता या प्रकरणातील आरोपी मुलाच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांसमोर येत साहिलच्या आईची माफी मागितली. मात्र, इन्ना माकन यांनी "तुमचं सॉरी माझा मुलगा परत आणू शकत नाही," असं म्हणत संताप व्यक्त केला.

लंडनला जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं!

साहिल हा इन्ना यांचा एकमेव आधार होता. २०१८ मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने साहिलला लहानाचं मोठं केलं होतं. साहिल उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला जाणार होता. "माझा मुलगा या देशातील अनागोंदी बघून बाहेर जावा असं मला वाटायचं, पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. आता माझ्या आयुष्यात ना सकाळ उरली आहे, ना कामावर जाण्याचं कोणतं कारण," असं म्हणताना इन्ना यांना अश्रू अनावर झाले.

रील आणि बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह

अपघाताच्या वेळी कारमध्ये आरोपीची बहीण रील बनवत असल्याचा आरोप होत आहे. यावर आरोपीच्या वडिलांनी कबुली दिली की, आजकालची मुलं व्हिडिओ बनवतात, पण त्या दिवशी मुलगा न सांगता गाडीची चावी घेऊन गेला होता. गाडीवर यापूर्वी असलेले अनेक दंड हे ड्रायव्हरच्या नावावर असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

कायदेशीर गुंतागुंत आणि आरोपीची सुटका

आरोपीचे वडील दावा करत आहेत की त्यांचा मुलगा १७ वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे जन्म दाखलाही आहे. सध्या आरोपीला १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एका निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्याला अशी सवलत मिळाल्याने साहिलच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त होत आहे.

Web Title : द्वारका हिट एंड रन: शोकग्रस्त माँ का सवाल, 'क्या आपकी माफ़ी उसे वापस लाएगी?'

Web Summary : दिल्ली के द्वारका में, एक माँ हिट एंड रन में मारे गए अपने 23 वर्षीय बेटे का शोक मना रही है। आरोपी की माफ़ी को शोकग्रस्त माँ ने खारिज कर दिया, जिसने सवाल किया कि क्या इससे उसका बेटा वापस आ सकता है, जो उसके पति की मृत्यु के बाद उसका एकमात्र सहारा था, और जिसके लंदन में पढ़ने के सपने चकनाचूर हो गए।

Web Title : Dwarka Hit-and-Run: Grieving Mother Asks, 'Will Your Sorry Bring Him Back?'

Web Summary : In Delhi's Dwarka, a mother mourns her 23-year-old son killed in a hit-and-run. The accused's apology is rejected by the grieving mother, who questions if it can bring back her son, her sole support after her husband's death, and whose dreams of studying in London were shattered.