शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 6:00 AM

माजी मुख्यमंत्र्यांमुळे हायप्रोफाईल सीट, मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण 

गजानन चोपडे, लोकमत न्यूज नेटवर्क, राजनांदगाव : पाटण विधानसभा  मतदारसंघातून पाच वेळा निवडून येणाऱ्या छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने यंदा लोकसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. गेल्या सात लोसभा निवडणुकीत एक अपवाद वगळता सहा वेळा भाजपनेच येथे बाजी मारली आहे. २००० साली राज्याची स्थापना झाल्यापासून भाजपने ही जागा पोटनिवडणुकीत एकदाच गमावली आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा बघेल यांच्यावर डाव लावला आहे. या मतदारसंघातील ८ विधानसभा क्षेत्रांपैकी काँग्रेसच्या ताब्यात ५ जागा असून तीन जागांवर भाजपचा कब्जा आहे. असे असले तरी भाजपला या जागांवर सात लाख पाच हजार ३७५ मते मिळाली होती तर काँग्रेसला पाच जागांवर सहा लाख ७४ हजार ७७६ मतांवर समाधान मानावे लागले होते.

राज्याच्या  स्थापनेनंतर लोकसभा निवडणूक लढणारे भूपेश बघेल हे दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अजित जोगी यांनी हासमुंदमधून निवडणूक लढविली होती. माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बघेल राजनांदगावमधून निवडणूक लढवीत असल्यानेही ही सीट हाईप्रोफाईल झाली आहे. भाजपने दुसऱ्यांदा संतोष पांडे यांना उमेवारी दिली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क भाजपसाठी जमेची बाजू ठरत आहे. २०१९ मध्येही संतोष पांडे यांनी ही जागा जिंकली होती, हे विशेष. तर अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काँग्रेसचा पिच्छा सोडत नाही आहे. भूपेश बघेल यांच्या नावाला स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • भूपेश बघेल हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून २०१४ ते २०१९ पर्यंत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजनांदगावमधून उमेदवारी दिली.
  • तर मुख्यमंत्री असताना बघेल यांनी राजनांदगाव हा भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग याचा बालेकिल्ला असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप होत आहे.
  • गटबाजीमुळे काँग्रेस उमेदवाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांचाच विरोध असून त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो.

एकूण मतदार    १८,६२,०२१ पुरुष - ९,२७,१८४महिला - ९,३४,८२६ १९९६ ते २१०९ पर्यंत या मतदारसंघातून भाजपला सहावेळा यश मिळाले आहे. १९९८ साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी भाजपच्या प्रदीप गांधी यांचा पराभव केला होता. मात्र १९९९ मध्ये भाजपच्या डॅा. रमन सिंग यांनी ही जागा बळकावली. त्यानंतर रमन सिंग यांचे पक्षात वजन वाढले.   २०१९ मध्ये काय घडले? संतोष पांडे भाजप (विजयी) ६,६२,३८७ भोलाराम साहू काँग्रेस (पराभूत) ५,५०,४२१ 

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     २०१४    अभिषेक पटेल     भाजप         ६,४३,४७३२००९    मधुसूदन यादव    भाजप        ४,३७,७२१२००४    प्रदीप गांधी    भाजप        ३,१४,५२०१९९९    रमन सिंग    भाजप        ३,०४,६१११९९८    मोतीलाल वोरा    काँग्रेस        ३,०४,७०९

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस