विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:37 IST2025-09-14T15:36:43+5:302025-09-14T15:37:40+5:30

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल."

Will the opposition's wishes be fulfilled Will there be a split in the NDA This party made a 'demand' that increased Modi's tension | विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'

विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'


केंद्रीय मंत्री तथा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) चे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी रविवारी आपल्या बोधगया येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. यावेळी, "कोणत्याही परिस्थितीत मान्यताप्राप्त पक्ष बनणे हे आपल्या पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी पक्षाला किमान आठ जागा जिंकणे आवश्यक आहे. तसेच, एकूण मतांपैकी सहा टक्के एवढी मते मिळवणे आवश्यक आहे. एनडीए आघाडीत आपल्याला १५ जागा दिल्या तरच हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे, कारण सर्व जागा जिंकणे शक्य नसते," असे मांझी यांनी म्हटले आहे.

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल, असा इशाराह जितन राम मांझी यांनी दिला आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ्यात आपले १० ते १५ हजार मतदार आहेत आणि या आधारावर आपण निवडणुकीत एकटे ६% मते मिळवू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. 

याच बरोबर, पक्षाची स्थापना होऊन दहा वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत मान्यता नसलेला पक्ष राहणे आपल्यासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे, या निवडणुकीत आपल्यासाठी "करो या मरो" स्थिती असल्याचेही ते म्हणाले. यामुळे, विरोधकांची इच्छा पूर्ण होणार का...? NDA मध्ये फुट पडणार का...? अशी चर्चा सुरू झाली आहे.

एनडीएमध्ये आपली ताकद असल्याचा दावा करत मांझी म्हणाले, आपला पक्ष पैसे खर्च न करता गर्दी जमवतो, तर इतर पक्ष पैशाच्या जोरावर गर्दी जमवतात. एनडीएच्या नेत्यांनाही हे माहिती आहे. जागावाटपात प्रत्यक्षात कोणता पक्ष जिंकू शकतो, हेही पाहिले जाईल. मांझी यांनी विश्वास व्यक्त केला की, आपल्याल पुरेशा जागा मिळतील आणि २०२५ मध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळेल.

Web Title: Will the opposition's wishes be fulfilled Will there be a split in the NDA This party made a 'demand' that increased Modi's tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.