शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 22:35 IST2025-07-01T22:34:39+5:302025-07-01T22:35:23+5:30
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे...

शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियापासून ते टीव्हीवरील चर्चांपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.
यावेळी, शशीथरून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता, दुबे म्हणाले, "यासंदर्भात मी काहीही सांगू शकत नाही. ना माझे थरूर यांच्यासोबत काही व्यक्तिगत बोलणे होते, ना पक्षातही यासंदर्भात काही चर्चा आहे."
निशिकांत दुबे पुढे म्हणाले, "शशी थरूर संसदेच्या आयटी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, आमचे गंभीर मतभेद होते. माझे त्यांच्यासोबत एवढे भांडण झाले होते की, मी एका वर्ष समितीच्या बैठकांना जाणेही बंद केले होते."
दुबे यांच्या मते, "थरूर हे समिती, सोशल मीडिया आणि राजकीय अजेंड्याच्या माध्यमाने चालवायचे. उलट, समितीचे काम माध्यमांमध्ये स्वतःला हायलाइट करणे नसते, तर दीर्घकालीन समाधान देणे असते. पेगासस हेरगिरी वादाचे उदाहरण देताना ते म्हणाले, जेव्हा, भारत सरकारवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, तेव्हाही थरूर यांनी समितीमध्ये जबरदस्तीने हा मुद्दा उपस्थित करत, त्याला राजकीय रंग दिला होता.
दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, शशी थरूर आणि त्यांचा एक फोटो माय गव्हर्नमेंट इंडियाच्या पेजवर दिसला होता. या दरम्यान काही बोलणे झाले का? असे विचारले असता दुबे म्हणाले, "नाही, माझे त्यांच्यासोबत काहीही बोलणे झाले नाही. ते दुसऱ्या कोणत्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून तेथे होते आणि मी एका वेगळ्या कार्यक्रमात होतो. ते अमेरिकेच्या शिष्टमंडळात होते, मात्र माझी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची वैयक्तिक चर्चा झाली नाही."