नितीन नबीन यांना राज्यसभेत पाठवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:40 IST2026-01-05T11:39:22+5:302026-01-05T11:40:18+5:30
या वेळी उपेंद्र कुशवाहा यांना राज्यसभेची जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याचे संकेत आहेत.

नितीन नबीन यांना राज्यसभेत पाठवणार?
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून राज्यसभेत पाठविले जाण्याची शक्यता आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजप राज्यसभेसाठी नितीन नबीन यांचे नाव पुढे करू शकतो.
याशिवाय दुसऱ्या जागेसाठीही भाजप एखादा नवा चेहरा राज्यसभेत पाठवू शकतो, अशी चर्चा आहे. सध्या निवृत्त होत असलेल्या पाचही राज्यसभा सदस्यांपैकी एकही भाजपचा नसल्याने हा भाजपसाठी मोठा राजकीय फायदा ठरणार आहे. या वेळी उपेंद्र कुशवाहा यांना राज्यसभेची जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याचे संकेत आहेत.
महाआघाडीकडे ३५ आमदार
महाआघाडीकडे ३५ आमदार आहेत (आरजेडी-२५, काँग्रेस-६, सीपीआय (एमएल)एल-२, सीपीआय (एम)-१ आणि आयआयपी-(१). ही जागा जिंकण्यासाठी महाआघाडीला एमआयएम (५) आणि बसपा (१) यांच्या समर्थनाची गरज आहे.
‘एनडीए’कडे २०२ आमदार
२४३ सदस्यांच्या सभागृहात, एनडीएकडे २०२ आमदार आहेत. (भाजप- ८९, जेडीयू- ८५, एलजेपी- १९, एचएएम- ५ आणि आरएलएम- ४)