शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर असा लागेल निकाल, पुन्हा मोदी सरकार की राहुल गांधीचा पलटवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 23:07 IST

नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत  आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

नवी दिल्ली - अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सध्या विविध कारणांमुळे टीकेचे धनी होत आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील जनतेचा विश्वास कायम असल्याचे समोर येत आहे. साडे तीन वर्षांनंतरही देशात मोदी लाट कायम असून आजच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाली तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असे एक सर्व्हेमधून समोर आले आहे. सी व्होटर या संस्थेने हा सर्व्हे केला असून, या सर्व्हेमध्ये देशभरातील 543 मतदार संघांमधील जनमताचा कानोसा घेण्यात आला आहे.   नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत  आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपा सरकार लोकसभा निवडणुकीत बाजी मारेल, असा   अंदाज या सर्व्हेंमधून व्यक्त करण्यात आला आहे. हा सर्व्हे 3 डिसेंबर ते 3 जानेवारी या काळात करण्यात आला होता. या सर्वेमधील अंदाजानुसार काही प्रमाणात नुकसान होत असले तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा घवघवीत यश संपादन करू शकतो. तसेच नितीश कुमार  यांच्या संयुक्त जनता दलासोबत नव्याने झालेल्या आघाडीचाही भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र 2014 साली ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे, अशा ठिकाणी भाजपाच्या जागांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पण पश्चिम बंगाल आणि ओदिशासारख्या राज्यात तसेच पूर्वोत्तर भारतात भाजपाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थितीत 2014 च्या तुलनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भाजपाच्या तुलनेत काँग्रेच्या जागांमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हा सर्व्हे म्हणतो. मात्र काँग्रेसने स्थानिक पक्षांसोबत आघाडी केल्यास भाजपाच्या अडचणी वाढू शकतात.   पंतप्रधान पदासाठी मोदी सर्वाधिक लोकप्रिय असून, 62.7 टक्के मतदारांनी मोदींना पसंती दिली आहे. तर राहुल गांधीना 12.6 टक्के मतदारांची पसंती आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही प्रत्येकी साडे चार टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.  

आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा - रालोआ - 335 जागा आणि 39.7 टक्के मते- भाजपा - 279 जागा आणि सहकारी 56- संपुआ - 89 जागा आणि 23.6 टक्के मते- काँग्रेस 60 जागा आणि सहकारी 29 - इतर पक्ष - 119 जागा   

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी