Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 06:55 IST2022-04-05T06:52:00+5:302022-04-05T06:55:41+5:30

Nitish Kumar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य  वाटले.

Will he remain as Chief Minister or will he go to Rajya Sabha? Nitish Kumar punctuated the discussion, said ... | Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

- एस. पी. सिन्हा
 पाटणा : बिहारचेमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य  वाटले.
नितीशकुमार यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार केले जाणार आहे, अशी चर्चा बिहारमध्ये मागील आठवड्यात रंगली होती. नितीशकुमार विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे सदस्य होते. त्याचप्रमाणे त्यांनी लोकसभेतही नेतृत्व केलेले आहे. ते आजवर राज्यसभेचे सदस्य झालेले नाहीत. त्यामुळे उपराष्ट्रपती होऊन ते राज्यसभेचे सभापती होऊ शकतात, अशी चर्चा रंगली होती. 

Web Title: Will he remain as Chief Minister or will he go to Rajya Sabha? Nitish Kumar punctuated the discussion, said ...