शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:30 IST

झारखंड विधानसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा

रांची: येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी मंदिर उभारू, अशी मोठी घोषणा भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी केली आहे. झारखंड विधानसभेच्या प्रचारासाठी पाकुडमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुढील चार महिन्यांत अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचं म्हटलं. अयोध्येत रामाचं मंदिर उभारण्यात यावं, ही भारतीयांची कित्येक दशकांपासूनची मागणी असल्याचं अमित शहा म्हणाले. 'काही दिवसांपूर्वीच अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. अयोध्येत प्रभू रामाचं भव्यदिव्य मंदिर उभारलं जावं ही १०० वर्षांपासून जगभरातल्या भारतीयांची भावना होती. राम मंदिरांची उभारणी व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या वकिलांनी यामध्ये अडथळे आणले,' अशा शब्दांत अमित शहा काँग्रेसवर बरसले. या प्रकरणात खटला चालवू नका, असं काँग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल न्यायालयाला सांगत होते. त्यांच्या पोटात नेमकं का दुखत होतं, असा सवाल शहांनी उपस्थित केला.  काँग्रेसवर जोरदार टीका करताना अमित शहांनी अयोध्येत राम मंदिराची उभारणी केव्हा होणार, यावरही भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. आता पुढील ४ महिन्यांमध्ये अयोध्येत प्रभू रामाचं गगनचुंबी मंदिर उभारू, अशी घोषणा शहांनी केली. झारखंडमधील सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. काँग्रेस ना विकास देशाचा करू शकते, ना देशाला सुरक्षित ठेवू शकते. त्यांना जनभावनादेखील समजत नाही, अशा शब्दांत अमित शहांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAmit Shahअमित शहाBJPभाजपाkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस