पतीसमोरच वैष्णवीने प्रियकर मनोजसोबत केलं लग्न, लोकही झाले अवाक्; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:09 IST2025-04-09T14:06:13+5:302025-04-09T14:09:40+5:30

काही दिवसांपूर्वी पतीने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याची घटना समोर आली होती. तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.

Wife Vaishnavi married her boyfriend Manoj in the tehsil area, her husband watched; people were also speechless | पतीसमोरच वैष्णवीने प्रियकर मनोजसोबत केलं लग्न, लोकही झाले अवाक्; व्हिडीओ व्हायरल

पतीसमोरच वैष्णवीने प्रियकर मनोजसोबत केलं लग्न, लोकही झाले अवाक्; व्हिडीओ व्हायरल

Extra Marriage Affair News:  २०२३ मध्ये वैष्णवीचे भंवरसिंह सोबत लग्न झालं. दोघांचा संसार सुरू होता. पण, अचानक नात्यात दुरावा आला. वैष्णवीचे गावातील एका तरुण मुलावर प्रेम जडलं. त्यानंतर वैष्णवी सासरी राहायचं टाळू लागली. ती माहेरीच जास्त राहू लागली. पतीने तिच्या आई-वडिलांकडे याबद्दल सांगितलं आणि वैष्णवीचं प्रेम प्रकरण समोर आलं. त्यानंतर पतीला सोडून देत वैष्णवीने कुटुंबीयांसमोरच प्रियकरासोबत लग्न केलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात. कायमगंज तहसील परिसरात वैष्णवीचे तिच्या प्रियकरासोबत नोंदणी पद्धतीने लग्न झालं. दोघांनी एकमेकांना हार घातले. पण, पतीसमोरच वैष्णवी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करत असल्याचे बघून लोक अवाक् झाले. 

वाचा >१३ वर्षीय मुलगा सकाळी स्कूल बसनं शाळेत गेला अन् सायंकाळी शववाहिकेतून प्रेत घरी आलं

वैष्णवी तिच्या प्रियकरासोबत लग्न करत असताना व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात व्हिडीओ तिच्या प्रियकराला हार घालते आणि पाया पडते. या विवाहाल वैष्णवीच्या पतीबरोबर, तिची आई, सासू हेही उपस्थित होते. 

लग्नानंतर वैष्णवीच्या आयुष्यात आला मनोज

मिळालेल्या माहितीनुसार, कायमगंज जिल्ह्यातील सिकंदरपूर खास गावच्या वैष्णवीचा पटियालातील भंवर सिंह सोबत २०२३ मध्ये लग्न झालं होतं. पण, लग्नापासूनच दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. त्यानंतर वैष्णवी पतीसोबत राहायचं टाळू लागली. 

वैष्णवी माहेरीच जास्त राहू लागली. पण, याच काळात वैष्णवीचे गावातील मनोजसोबत प्रेम संबंध जुळले. भंवर सिंहने सासूकडे वैष्णवीला परत नांदायला पाठण्यास सांगितले. वैष्णवीने भंवर सिंहसोबत राहण्यास नकार दिला. त्यानंतर तिने मनोजसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. 

आईने लावून दिले लग्न

वैष्णवीचे मनोज सोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या आईने आणि पतीने तिचे लग्न मनोजसोबत लावून दिले. तहसील परिसरात दोघांचा नोंदणी पद्धतीने विवाह पार पडला. 

वैष्णवीचा पती भंवर सिंह म्हणाला, 'दोन वर्षापूर्वी आमचे लग्न झाले होते. पण, ती मध्येच सोडून गेली. आता तिचे दुसरे लग्न झाले आहे.' वैष्णवीची आई म्हणाली, 'माझ्या मुलीचे लग्न झाले होते, पण ती तिथे आनंदी नव्हती. आणि ती पतीसोबत राहतही नव्हती. आज आम्ही तिचं दुसरं लग्न लावून दिलं. ती आनंदात आहे.'

Web Title: Wife Vaishnavi married her boyfriend Manoj in the tehsil area, her husband watched; people were also speechless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.