शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

स्वत:वर हल्ला करवून घेणाऱ्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:55 PM

BJP MP Kaushal Kishore son shot updates : उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याने स्वत:वर हल्ला करवून गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती. (Crime News) दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेला आयुष रुग्णालयातून फरार झाला आहे. दरम्यान, आयुषच्या पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. (The wife of the son of a BJP MP who shot herself has carried out a big assassination attempt)आयुषने कुणाला तरी फसवण्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचले असल्याचा दावा, तिने केला आहे. तसेच तो दिल्लीतील सरकारी निवासस्थानामध्ये लपून बसल्याचा तसेच खासदार वडील आपल्या मुलाला वाचवत असल्याचा दावाही तिने केला आहे. 

आयुषची पत्नी म्हणाली की, माझे पती दिल्लीतील सरकारी निवासस्थानात लपून बसला आहे. माझे आयुषचे फोनवर बोलणे झाले होते. त्याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आयुष आर्थिक अडचणींचा सामना करत होता. व्यावहारिक देवघेवीवरून त्याचे चंदन गुप्ता नामक व्यापाऱ्यासोबत त्याचा वाद झाला होता. त्यालाच फसवण्यासाठी त्याने हे कारस्थान रचली आहे, असा दावा आयुषच्या पत्नीने केला. 

फरार झाल्यानंतर आयुष लखनौमध्ये खासदार असलेल्या वडलांच्या घरी लपला होता. त्यानंतर आता तो खासदार निवासामध्ये राहत आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून येत असलेल्या दबावामुळे आय़ुष मला सोडत आहे. त्याचावरोधात साक्ष दिल्यास तो माझी साथ देणार नाही. आयुष आणि माझा भाऊ आदर्श यांच्यात मैत्री आहे. या मैत्रीमुळेच आदर्शने आयुषवर गोळी चालवण्यात त्याची साथ दिली होती.   आमचे वैवाहिक जीवन सामान्य नव्हते. या विवाहासाठी आयुषचे कुटुंबीय तयार नव्हते. तसेच आम्हा दोघांमध्येही काही आलबेल नव्हते. तो मला मारहाण करत असे, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश