The wife of the son of a BJP MP who shot herself has carried out a big assassination attempt | स्वत:वर हल्ला करवून घेणाऱ्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट 

स्वत:वर हल्ला करवून घेणाऱ्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट 

लखनौ - उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती. (Crime News) दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेला आयुष रुग्णालयातून फरार झाला आहे. दरम्यान, आयुषच्या पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. (The wife of the son of a BJP MP who shot herself has carried out a big assassination attempt)

आयुषने कुणाला तरी फसवण्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचले असल्याचा दावा, तिने केला आहे. तसेच तो दिल्लीतील सरकारी निवासस्थानामध्ये लपून बसल्याचा तसेच खासदार वडील आपल्या मुलाला वाचवत असल्याचा दावाही तिने केला आहे. 

आयुषची पत्नी म्हणाली की, माझे पती दिल्लीतील सरकारी निवासस्थानात लपून बसला आहे. माझे आयुषचे फोनवर बोलणे झाले होते. त्याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आयुष आर्थिक अडचणींचा सामना करत होता. व्यावहारिक देवघेवीवरून त्याचे चंदन गुप्ता नामक व्यापाऱ्यासोबत त्याचा वाद झाला होता. त्यालाच फसवण्यासाठी त्याने हे कारस्थान रचली आहे, असा दावा आयुषच्या पत्नीने केला. 

फरार झाल्यानंतर आयुष लखनौमध्ये खासदार असलेल्या वडलांच्या घरी लपला होता. त्यानंतर आता तो खासदार निवासामध्ये राहत आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून येत असलेल्या दबावामुळे आय़ुष मला सोडत आहे. त्याचावरोधात साक्ष दिल्यास तो माझी साथ देणार नाही. आयुष आणि माझा भाऊ आदर्श यांच्यात मैत्री आहे. या मैत्रीमुळेच आदर्शने आयुषवर गोळी चालवण्यात त्याची साथ दिली होती. 
  
आमचे वैवाहिक जीवन सामान्य नव्हते. या विवाहासाठी आयुषचे कुटुंबीय तयार नव्हते. तसेच आम्हा दोघांमध्येही काही आलबेल नव्हते. तो मला मारहाण करत असे, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The wife of the son of a BJP MP who shot herself has carried out a big assassination attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.