अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:48 IST2025-09-07T10:47:27+5:302025-09-07T10:48:42+5:30

पत्नीच्या शिक्षणाचा आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने त्याची लायब्ररी विकली.

wife left her husband after getting job in delhi police in Haryana palwal | अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

फोटो - ndtv.in

हरियाणातील पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका पतीने पत्नीने त्याची मोठी फसवणूक करून पोलिसात नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. पलवलच्या बडोली गावातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय प्रीतमने २०२१ मध्ये एक लायब्ररी सुरू केली जेणेकरून तरुणांना सरकारी नोकरीची तयारी करता येईल. या लायब्ररीमध्ये त्याची राजीव नगरमधील एका तरुणीशी ओळख झाली. 

ओळखीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. प्रीतमने आपल्या कुटुंबालाही या नात्याबद्दल सांगितलं. ४ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी बल्लभगडमधील आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर ते एका फ्लॅटमध्ये राहू लागले. या काळात त्याच्या पत्नीने दिल्ली पोलीस भरतीसाठी अर्ज केला. 

लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं

प्रीतमने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या शिक्षणाचा आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने त्याची लायब्ररी विकली. तसेच जमिनीचा काही भागही विकला. प्रीतमने पत्नीला लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट दोन्हीमध्ये खूप मदत केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसात ट्रेनिंगसाठी बोलावण्यात आलं.

ट्रेनिंग संपल्यानंतर थेट माहेरी गेली

प्रीतमचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीने व्हेरिफिकेशनदरम्यान ती अविवाहित असल्याचं सांगितलं, मात्र तिचं लग्न झालेलं आहे. त्याला हा धक्कादायक प्रकार नंतर कळला. फेब्रुवारी २०२५ मध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर त्याची पत्नी थेट माहेरी गेली आणि पतीशी कोणताही संपर्क साधला नाही. जेव्हा प्रीतम पत्नीला घेण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा त्याच्या सासरच्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला. तसेच पत्नीनेही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 
 

Web Title: wife left her husband after getting job in delhi police in Haryana palwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.