बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:17 IST2025-10-03T19:16:59+5:302025-10-03T19:17:36+5:30

कर्नाटकात एका महिलेने तिच्या पतीने केलेल्या धक्कादायक कृत्याची तक्रार पोलिसांत दिली.

Wife horrifying ordeal Husband installed a camera in the bedroom and sent videos of private moments to friends | बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य

बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य

Bengluru Crime: कर्नाटकात एका पतीचे हादरवणारे कृत्य समोर आलं आहे. कर्नाटकातील पुट्टेनहल्ली इथल्या एका महिलेने तिच्या पतीवर त्यांचे खासगी व्हिडीओ मित्रांना दाखवल्याचा आरोप केला. पतीने महिलेच्या बेडरूममध्ये कॅमेरा बसवून त्याच्या मित्रांना खाजगी क्षणांचे व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने तिच्या मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. तिने नकार दिल्यावर तिचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यांनुसार, तिने डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद इनामुल हकशी लग्न केले. लग्नाच्या वेळी तिला ३४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि यामाहा बाईक देण्यात आली होती. लग्नानंतर तिला कळले की तिचा नवरा आधीच विवाहित आहे. शिवाय, त्याचे इतर १९ महिलांशी प्रेमसंबंध असल्याचे कळलं. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पतीने बेडरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा बसवला होता आणि त्यांचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करत असे आणि ते परदेशातील मित्रांना पाठवत असे.

तक्रारीनुसार, पतीने तिच्यावर भारताबाहेरील त्याच्या संपर्कात असलेल्यांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेने तिच्या पतीवर सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये आणि अगदी तिच्या पालकांच्या घरीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला. पतीने फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर तिच्यावर हल्ला केला.

पीडितेच्या तक्रारीत सासरच्या लोकांचीही नावे आहेत. फेब्रुवारीमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान, पतीच्या बहिणीने तिचा अपमान केल्याचा आरोप आहे, तर तिच्या मेहुण्याने तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा आरोप आहे. २१ सप्टेंबर रोजी, आरोपीने वादाच्या वेळी तक्रारदारावर हल्ला केला आणि नंतर घरातून पळून गेला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती आणि इतर आरोपी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wife horrifying ordeal Husband installed a camera in the bedroom and sent videos of private moments to friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.