शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:58 IST

Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेी केजरीवालांना ठीक लोकसभा निवडणुकीपूर्वी अटक करण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी(दि.30) अंमलबजावणी संचालनालयाला (ED) प्रश्न विचारले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांना अटक करण्याच्या वेळेबाबत उत्तर देण्यास सांगितले. 

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “आयुष्य आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण ते नाकारू शकत नाही," यावर जोर दिला. तसेच, खंडपीठाने राजू यांना इतर अनेक प्रश्न विचारले असून, या प्रकरणाच्या पुढील तारखेला या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

सिंघवी काय म्हणाले?ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडली. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. एकतर त्यांच्याकडे कोणता पुरावा, याची माहिती नाही. ज्याच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, ती विधाने 7 ते 8 महिने जुनी आहेत. या प्रकरणात केजरीवाल दोषी असल्याचे ईडीला वाटत होते, तर त्यांना अटक करायला इतका वेळ का लावला? सप्टेंबर 2022 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही, आता अचानक अटक करण्यात आली. ते कठोर गुन्हेगार किंवा दहशतवादी नाहीत, जे विमानाने देश सोडून पळून जातील.

केजरीवाल 9 ED समन्सला का हजर झाले नाही : SCत्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी विचारले की, ईडीने केजरीवालांना 9 वेळा नोटीस पाठवली, प्रत्येक वेळी त्यांनी चौकशीसाठी येण्यास नकार का दिला? यावर सिंघवी म्हणाले, सीबीआयने फोन केला तेव्हा ते गेले. केजरीवालांनी ईडीच्या नोटिसीलाही सविस्तर उत्तर दिले. पण समन्स बजावल्यावर तुम्ही यायलाच हवं, असं ईडी करू शकत नाही. ईडी कार्यालयात न जाणे हा त्यांचा अधिकार आहे. याप्रकरणी स्वतंत्र खटला सुरू आहे. हा अटकेचा आधार किंवा कारण असू शकत नाही. 

केजरीवाल 21 मार्चपासून तुरुंगात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. ते 1 एप्रिलपासून तिहार तुरुंगात बंद असून 7 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय