Why PM Modi gossip on declining economy? | अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?
अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : जगातील आंतरराष्ट्रीय एजन्सींनी भारताच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे; पण पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार हे मानण्यास तयार नाही की, अर्थव्यवस्थेवर काही संकट आहे. या मुद्यावरून काँग्रेस सतत सरकारवर हल्ले करत आहे.

आयएमएफने १५ आॅक्टोबर रोजी भारताच्या जीडीपीचा अंदाज ७ टक्क्यांवरुन कमी करुन ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, जागतिक बँकेने १३ ऑक्टोबर रोजी २०१९- २० साठी जीडीपीचा दर ६.८ टक्क्यांवरुन कमी करुन ६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

प्रियांका गांधींनी केले सरकारला लक्ष्य

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या टिप्पणीने या मुद्याला आणखी वादग्रस्त बनविले आहे. प्रियांका गांधी यांनी पीयूष गोयल यांच्या टिप्पणीवर टष्ट्वीट केले आहे की, मंत्र्यांचे काम कॉमेडी सरकार चालविणे हे आहे.अर्थव्यवस्था सुधारण्याचे नव्हे. भाजपचे नेते आपले काम करण्याऐवजी दुसऱ्यांनी केलेले काम नाकारत आहेत. त्यांना हे दिसत नाही की, अर्थव्यवस्था घसरत आहे.


Web Title: Why PM Modi gossip on declining economy?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.