शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:59 IST

जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या युद्धविरामाबाबत बुधवारी काँग्रेसची एक मोठी बैठक झाली. यानंतर, पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, "गेल्या २० दिवसांत काँग्रेसची ही तिसरी मोठी बैठक आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनीही सहभाग घेतला आहे. २२ एप्रिलपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी वारंवार ऐक्य आणि एकतेबद्दल बोलत आहेत. त्यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आणि ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केले. राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष म्हणाले की, आम्ही सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही दहशतवाद आणि पाकिस्तानविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईला पाठिंबा देत आहोत. आमच्या दोन सर्वपक्षीय बैठका झाल्या. दोन्ही बैठकांना पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. ही सर्वपक्षीय बैठक औपचारिकतेसाठी आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आणि खरगे यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. युद्धविरामाची पहिली घोषणा ट्रम्प यांनी का केली? पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाहीत."

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश पुढे म्हणाले की, "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणतात की, चर्चा तिसऱ्या ठिकाणी व्हायला हवी. पंतप्रधानही यावर काहीही बोलत नाहीत. आपले परराष्ट्र मंत्री जगाच्या विविध मुद्द्यांवर बोलत राहतात, प्रवचने देत राहतात, पण त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. विरोधकांना विश्वासात का घेतले जात नाही? राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेहमी ऐक्याबद्दल बोलतात."

काँग्रेस 'जय हिंद' सभा आयोजित करणार!जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे. याचे श्रेय घेण्यासाठी राजकारण सुरू आहे. आम्ही देशातील सुमारे एक डझन शहरांमध्ये 'जय हिंद' सभा आयोजित करू आणि जनतेच्या वतीने सरकारला प्रश्न विचारू. या संदर्भात राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी