Rahul Gandhi : Video - "एवढे हँडसम आहात, लग्न का नाही करत?"; राहुल गांधींनी सांगितलं 'सत्य', म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:22 IST2023-10-11T13:04:20+5:302023-10-11T13:22:52+5:30

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडी-निवडी आणि विविध विषयांवरील त्यांचे मत याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.

why congress leader Rahul Gandhi not getting married Video viral | Rahul Gandhi : Video - "एवढे हँडसम आहात, लग्न का नाही करत?"; राहुल गांधींनी सांगितलं 'सत्य', म्हणाले...

फोटो - hindi.news18

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपर्यंत लग्न का केलं नाही? शेवटी, अशी कोणती कारणे आहेत ज्यांमुळे ते आतापर्यंत अविवाहित राहिले आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आता खुद्द राहुल गांधी यांनीच मंगळवारी जयपूरमध्ये दिली. महाराणी महाविद्यालयात विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपण लग्न का करत नाही याचा खुलासा केला. या संभाषणाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडी-निवडी आणि विविध विषयांवरील त्यांचे मत याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. हुशार आणि हँडसम असूनही लग्नाचा विचार का करत नाही, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने केला. याला उत्तर देताना मी आपलं काम आणि काँग्रेस पक्षाला पूर्णपणे समर्पित आहे असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

"कामात आणि काँग्रेस पक्षात पूर्णपणे मग्न आहे" असं म्हटलं आहे. राहुल यांना त्यांच्या आवडत्या पदार्थांबद्दल आणि ठिकाणांबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, कारलं, मटार आणि पालक सोडून इतर सर्व गोष्टींबद्दल कोणतीही अडचण नाही. मला नेहमीच नवीन ठिकाणं पाहायला आवडतात. विद्यार्थिनींनी त्यांना त्वचेची काळजी कशी घेता असं देखील विचारलं. त्यावर फक्त पाण्यानेच चेहरा धुतो आणि कोणतीही क्रीम किंवा साबण वापरत नाहीत असं उत्तर दिलं. 

राहुल गांधींनी महिलांना संपत्ती आणि शक्ती समजून घेण्याचं महत्त्व अधोरेखित केलं, कारण त्यांना विश्वास होता की या क्षेत्रातील ज्ञान खरे स्वातंत्र्य देईल. संभाषणादरम्यान, त्यांना एक लोकप्रिय मीम आठवलं ज्यामध्ये ते "खटम, टाटा, बाय-बाय" असं म्हणताना दिसत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: why congress leader Rahul Gandhi not getting married Video viral