शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:14 IST

दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सध्या दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असणार, याची चर्चा सर्वत्र होत आहे. अवघ्या जगाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. सध्याचे दलाई लामा हे आता वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत.  त्यामुळे आता त्यांचे अधिकार कुणाकडे जाणार याविषयी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पश्चात तिबेटी बौद्ध परंपरा टिकवून ठेवणं आवश्यक असल्याने, उत्तराधिकारी हा अतिशय महत्त्वाचा असतो. यातच चीनचा डोळा तिबेटवर असल्याने, या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. मात्र, आता तिबेटीयन दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेलाच आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी ठामपणे सांगितले की, "दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड केवळ स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच केली जाईल. यामध्ये इतर कोणालाही अधिकार नाही."

दलाई लामांच्या संस्थेचे अधिकृत विधानबुधवारी, दलाई लामांनी स्वतः स्पष्ट केले होते की त्यांची संस्था, 'गाडेन फोडरंग ट्रस्ट', हीच त्यांच्या भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देणारी एकमेव अधिकृत संस्था आहे. चीनने त्यांची उत्तराधिकार योजना फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान अधिक महत्त्वाचे ठरले आहे. किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "दलाई लामा ही बौद्धांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित संस्था आहे. त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की, हा अवतार केवळ स्थापित परंपरेनुसार आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच ठरवला जातो."

चीनच्या दाव्याला भारताचे प्रत्युत्तरचीनने असा दावा केला होता की, भविष्यात कोणताही दलाई लामा चीनची मान्यता मिळाल्यासच वैध ठरेल. भारताने या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आहे आणि तिबेटी परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. रिजिजू म्हणाले, "दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे इतर कोणतीही व्यक्ती किंवा देश ठरवू शकत नाही." किरेन रिजिजू स्वतः बौद्ध धर्माचे अनुयायी असून ते तिबेटी बौद्ध समुदायातील दलाई लामांच्या भूमिकेकडे आदराने पाहतात. त्यांचे हे विधान भारत सरकारची चीनविरोधात मजबूत आणि स्पष्ट भूमिका दर्शवते.

कसा निवडला जातो उत्तराधिकारी?दलाई लामांच्या उत्तराधिकाराचा विषय फक्त धार्मिक नव्हे, तर राजकीय आणि भू-राजकीयदृष्टिकोनातूनही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म होतो, अशी बौद्ध श्रद्धा आहे. दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी शोधण्याची पारंपरिक प्रक्रिया दीर्घ आणि गुंतागुंतीची असते. ही प्रक्रिया बौद्ध भिक्षु, तिबेटी सरकार इन-एक्झाइल आणि धार्मिक संस्था पूर्ण करतात. 

चीनचा हस्तक्षेप का?दलाई लामा भारतात निर्वासित जीवन जगत आहेत.  भारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश तिबेटच्या धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन करतात. मात्र, चीन तिबेटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यांच्याकडून तिथे धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचा प्रयत्न देखील होत आहे. यामुळेच पुढील दलाई लामा निवडीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागले, असा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. दुसरीकडे, चीनकडून 'राजकीय दलाई लामा' अर्थात त्यांच्या नियंत्रणात असलेला एक चेहरा यासाठी निवडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दलाई लामांचा ९० वा वाढदिवसदलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात भारत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंग उर्फ ​​लल्लन सिंग उपस्थित राहणार आहेत. भारतात राहणारे बौद्ध दलाई लामांच्या शिकवणी आणि परंपरांचे पालन करतात, असेही रिजिजू यांनी म्हटले. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाIndiaभारतchinaचीन