मैदानात हजारो कंडोम पाकीटं कुणी फेकली?; खुलासा होताच अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:46 AM2022-03-24T11:46:59+5:302022-03-24T11:47:47+5:30

तपासावेळी सापडलेली कंडोम आणि उघड्यावर फेकण्यात आलेले कंडोम एकाच बॅचमधील असल्याची पुष्टी करण्यात आली.

Who threw thousands of condom bags on the ground ?; Inquiry revealed the incident in Uttar Pradesh | मैदानात हजारो कंडोम पाकीटं कुणी फेकली?; खुलासा होताच अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला

मैदानात हजारो कंडोम पाकीटं कुणी फेकली?; खुलासा होताच अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला

Next

पिलिभीत – उत्तर प्रदेशातील पिलिभीत इथं काही दिवसांपूर्वी हजारो कंडोमची पॅकेट फेकलेली आढळल्याने खळबळ उडाली होती. केंद्र सरकारच्या एका संस्थेकडून ती पाठवली जात होती. आता या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. अखेर हे कंडोम कुणाला पाठवले होते? याचं सत्य समोर आले आहे. हजारोंच्या संख्येने उघड्यावर हे कंडोम सापडल्याने प्रशासनाकडून त्याची चौकशी केली गेली.

सीएमओ डॉ. आलोक कुमार शर्मा यांनी कॉलनीत रात्री छापा मारून त्याचे खरे कारण समोर आणलं आहे. उघड्यावर फेकलेले कंडोम लखीमपूर येथील एनजीओ जेएन बालकुंज यांना पाठवण्यात आले होते. या एनजीओला केंद्र सरकारच्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशनद्वारे पाठवण्यात आले होते. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासन हादरले. नखासा परिसरात हजारो कंडोम उघड्यावर फेकण्यात आले होते. छापेमारीवेळी अधिकाऱ्यांना एनजीओतील काही रेकॉर्ड गायब असल्याचं आढळले.

तपासावेळी सापडलेली कंडोम आणि उघड्यावर फेकण्यात आलेले कंडोम एकाच बॅचमधील असल्याची पुष्टी करण्यात आली. त्यामुळे सरकारी योजनेला कशारितीने हरताळ फासला जात असल्याचं उघड झाले. सीएमओने एनजीओ कार्यालयात सापडलेले कंडोम सँम्पल जप्त केले आहेत. बुधवारी एनजीओ चालवणाऱ्या काही लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. आता या तपासाचा रिपोर्ट नाकोकडे पाठवण्यात येईल. २० मार्चनंतर आजही कंडोम मैदानात पडल्याचं दिसून येते. जे अनेक लोकांनी गुपचूप उचलून नेली. मात्र या कंडोमचा वापर करता येणार नाही असं CMO अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तर NGO नं या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, त्यांच्याकडे २५० सेक्स वर्कर, १५० ड्रग्स एडिक्ट आणि ५० बाइसेक्सुअल लोकं आहेत. ज्यांना कंडोम वाटप करण्यात येणार होते. यातील काही स्वयंसेवक बनले आणि यांच्याकडे दर महिन्याला ६ ते ८ हजार कंडोम वाटप करण्यासाठी पाठवले जातात. परंतु स्वयंसेवकांपैकी काहींनी ते वाटले नसून फेकून दिले आहेत असं संस्थेने सांगितले.  

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या २० मार्चला पिलिभीतमध्ये एका मैदानात कंडोमची हजारो पाकिटं आढळून आली पिलिभीत शहरातील नखासा परिसरात हा प्रकार घडला. परिसरात कंडोमची हजारो पाकिटं लोकांना दिसली. पाकिटांमधील कंडोमची मुदत संपली असावी, असं आधी लोकांना वाटलं. मात्र एक्स्पायरी डेट २०२४ ची असल्याचं काहींच्या लक्षात आलं. आसपासच्या लोकांची नजर चुकवून काहींनी कंडोमची पाकिटं उचलली आणि खिशात टाकून तिथून निघून गेले.

Web Title: Who threw thousands of condom bags on the ground ?; Inquiry revealed the incident in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.