कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:04 AM2019-02-04T10:04:15+5:302019-02-04T10:20:50+5:30

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले.

who is rajeev kumar kolkata police commissioner west bengal cm mamata banerjee sit on dharna against cbi raid | कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देममता बॅनर्जींचे केंद्र सरकारविरोधात बंडसीबीआय आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्षकेंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही - ममता बॅनर्जी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी संध्याकाळी (3 फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागानं कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन मोठा वादंग निर्माण झाला.

शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखले आणि  त्यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने परिसरात तणाव वाढला.  

या सर्व घडामोडींदरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या. ममत बॅनर्जी सुरुवातीस राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यानंतर कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी रात्रीच धरणे आंदोलन सुरू केले. याठिकाणी राजीव कुमारदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. 



 


पण, ममता बॅनर्जी ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी रात्रीपासून धरणे आंदोलनास बसल्या आहेत, ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊया. 


कोण आहेत राजीव कुमार? 
कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे विश्वसनीय मानले जातात. 2016 मध्ये सुरजीत कर पुरकायस्थ यांच्या जागी कुमार यांची कोलकाताच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर पुरकायस्थ यांना सीआयडी विभागात बढती देण्यात आली. 
-1989 बॅचमधील पश्चिम बंगाल कॅडरचे आयपीएस अधिकारी  
- कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्ट फोर्सचे होते प्रमुख
- शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांचे तपास अधिकारी होते. हा घोटाळा 2013 साली उघडकीस आला होता. 

सीबीआयला नोंदवायचा आहे जबाब
या घोटाळ्यांमधील महत्त्वपूर्ण फायली आणि दस्तावेज कथित स्वरुपात गहाळ झाल्याने सीबीआयनं राजीव कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. पण यातील एकही अधिकारी सीबीआयसमोर हजर झाला नाही. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कित्येक नेत्यांवरही आरोप आहे. या घोटाळ्यांमुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.  



 

राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी - ममता बॅनर्जी
राजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. ते 24 तास आपले कर्तव्य पार पाडत असतात, असे ट्विट करत ममता बॅनर्जींना कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला. 
शिवाय, केंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असेही ट्विट ममता यांनी करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. 



\



 

Web Title: who is rajeev kumar kolkata police commissioner west bengal cm mamata banerjee sit on dharna against cbi raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.