Kanpur Lamborghini Crash: ज्याच्या वाढदिवसाला बॉलिवूड सेलिब्रिटी नाचले, त्याच रईसजाद्याच्या कारने ६ निष्पापांना चिरडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:00 IST2026-02-09T13:59:39+5:302026-02-09T14:00:22+5:30

Kanpur Lamborghini Accident: या भीषण अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून, रईसजाद्याच्या या रेसमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Who is Shivam Mishra, tobacco baron KK Mishra’s son, behind Kanpur Lamborghini crash | Kanpur Lamborghini Crash: ज्याच्या वाढदिवसाला बॉलिवूड सेलिब्रिटी नाचले, त्याच रईसजाद्याच्या कारने ६ निष्पापांना चिरडले!

Kanpur Lamborghini Crash: ज्याच्या वाढदिवसाला बॉलिवूड सेलिब्रिटी नाचले, त्याच रईसजाद्याच्या कारने ६ निष्पापांना चिरडले!

Kanpur Lamborghini Accident: एकेकाळी १०० कोटींच्या आलिशान गाड्यांच्या ताफ्यामुळे देशभरात चर्चेत आलेला कानपूरचा बडा तंबाखू व्यापारी के.के. मिश्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रविवारी दुपारी कानपूरच्या व्हीआयपी रोडवर मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याने आपल्या सुसाट कारने अक्षरशः तांडव माजवला. या भीषण अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून, रईसजाद्याच्या या रेसमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सुसाट कार अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ग्वालटोली परिसरात ही घटना घडली. शिवम मिश्रा आपल्या दिल्ली पासिंगच्या काळ्या रंगाच्या कारने व्हीआयपी रोडवरून अत्यंत वेगाने जात होता. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग इतका प्रचंड होता की शिवमचा ताबा सुटला आणि ही महागडी कार थेट फूटपाथवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडत पुढे गेली. धडक इतकी जोरात होती की, एक बुलेट स्वार हवेत उडून लांब फेकला गेला आणि कारचं चाक बुलेटच्या वर चढलं.

बाऊन्सरची गुंडगिरी; जखमींशी गैरवर्तन

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. संतप्त जमावाच्या तावडीतून पोलिसांनी मोठ्या मुश्कीलीने शिवमला बाहेर काढले. मात्र, जखमींचा आरोप आहे की, जेव्हा ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा तिथे आधीच हजर असलेल्या मिश्रांच्या बाऊन्सर्सनी त्यांच्याशी अरेरावी आणि शिवीगाळ केली. पैशाच्या जोरावर गरिबांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र तिथे पाहायला मिळाले.

आयटी रेड अन् १०० कोटींच्या गाड्यांचा 'तो' इतिहास

शिवम मिश्रा आणि त्याचे वडील के.के. मिश्रा हे नाव कानपूरसाठी नवीन नाही. मार्च २०२४ मध्ये त्यांच्या घरावर पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या छाप्यात १५० कोटींच्या टॅक्स चोरीचा खुलासा झाला होता. त्यांच्याकडे १६ कोटींची 'रॉल्स रॉयस', 'फरारी', 'मॅकलारेन' आणि 'लॅम्बोर्गिनी'सह तब्बल १०० कोटींहून अधिक किमतीच्या गाड्यांचा ताफा आढळला होता. शिवमने आपल्या वाढदिवसाला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सना बोलावले होते, त्यानंतरच तो आयकर विभागाच्या रडारवर आला होता.

पोलिसांनी केली अटक

सध्या पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली असून, शिवम मिश्राला ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दरम्यान, कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चाही रंगली आहे; मात्र पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. जखमींनी ग्वालटोली पोलीस ठाण्यात कडक कारवाईची मागणी केली आहे.

Web Title : कानपुर: रईसजादे की कार ने छह को कुचला, मचा हड़कंप!

Web Summary : कानपुर में के.के. मिश्रा के बेटे शिवम ने छह लोगों को कार से कुचल दिया। यह घटना कर चोरी के मामले और भव्य पार्टियों के बाद हुई है। जनता में आक्रोश है, अमीर वारिस के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग हो रही है।

Web Title : Kanpur Tycoon's Son's Car Mows Down Six; Sparks Outrage

Web Summary : Kanpur's K.K. Mishra's son, Shivam, ran over six people with his car. The incident follows a tax evasion case and lavish parties. Public anger is rising, demanding strict action against the wealthy heir.