भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केली. तिच्यावर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पुरवल्याचा आरोप आहे. मात्र, यानंतर ज्योती मल्होत्रा कोण आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची एक युट्यूबर आहे. ट्रॅव्हल विथ जो, असे तिच्या युट्यूब चॅनलचे नाव आहे. या चॅनेलवर तिचे ३७.७ लाख सबस्क्राइबर आहेत. याशिवाय, ती इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे १३२ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या तिच्या सोशल मीडिया हँडलवरून असे दिसते की तिला प्रवासाची आवड आहे आणि ती जगभरात फिरत असते.
लाईव्ह मिंटच्या मते, ज्योती मल्होत्रा दोनदा पाकिस्तानला भेट दिली. ज्योती २०२३ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी तिची नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी मैत्री झाली. यामुळे दानिश ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलद्वारे तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्योती गेल्या वर्षी काश्मीरला गेली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने इंन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. याशिवाय, तिने श्रीनगर ते बनिहाल असा ट्रेनने प्रवासही केला असल्याचे समजत आहे.