शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशामधील जबर मारहाणीच्या प्रकारांनीे व्हॉट्सअपही ‘भयभीत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 04:26 IST

व्हॉट्सअप, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाणीद्वारे ठार मारण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांमध्ये काही दिवसांत घडल्या आहेत.

नवी दिल्ली : व्हॉट्सअप, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाणीद्वारे ठार मारण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांमध्ये काही दिवसांत घडल्या आहेत. या हिंसाचारामुळे आम्हीही भयभीत झालो आहोत, असे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले आहे.समाजमाध्यमांचा वापर करुन पसरविल्या जाणाºया खोट्या व डोकी भडकविणाºया संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपला मंगळवारी दिला होता. सदर प्रकरणी या कंपन्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असेही सरकारने सुनावले होते.या इशाºयाची गंभीर दखल घेत व्हॉट्सअपने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे की, समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाºया अफवा, खोटी माहिती यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्या, केंद्र सरकार व नागरिकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांच्या सुरक्षिततेची कंपनीला काळजी असल्याने त्यादृष्टीनेच व्हॉट्सअपची रचना केली आहे. त्यानुसार लोक सुरक्षित राहाण्यासाठी आवश्यक ती माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळवू शकतात. नको असलेली माहिती डिलिट करु शकतात. त्याचबरोबर या अ‍ॅपचा गैरवापर टाळण्यासाठी लोकांनी सजग राहाण्याकरिता काही तांत्रिक सोयीही त्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत.तपासासाठी केले सहकार्यअफवा व खोट्या माहितीचा आपल्या अ‍ॅपद्वारे प्रसार होऊ नये म्हणून आजवर काय पावले उचलण्यात आली याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने या निवेदनात दिली आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधित यंत्रणांना व्हॉट्सअपने सक्रिय सहकार्य केले आहे.- अफवांमुळेच मुले पळविणाºया टोळीच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जमावाने केलेल्या मारहाणीत पाच निरपराधांचा बळी गेला होता. देशात विविध ठिकाणी झालेल्या जबर मारहाणीत गेल्या काही महिन्यांत २० जण मरण पावले आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप