शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कुमारस्वामींना भोवतेय वडिलांची भूतकाळातील 'ती' राजकीय खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:31 IST

वेळी काँग्रेसचे नेते राजभवनात उपस्थित असल्याने वाघेला यांचे समर्थक एका रुग्णवाहिकेतून राजभवनात आले होते.

नवी दिल्ली: येडियुरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये पडद्यामागच्या हालचालींनी वेग घेतला आहे. यानिमित्ताने राजकीय जाणकारांकडून इतिहासातील एक प्रसंग सातत्याने सांगितला जात आहे. हा प्रसंग ऐकल्यास काव्यात्मक न्याय (पोएटिक जस्टिस) काय असतो, याचा पूरेपूर प्रत्यय येऊ शकतो. 14 मार्च 1995 रोजी म्हणजे 22 वर्षांपूर्वी केशूभाई पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यावेळी काँग्रेसने भाजपा नेते शंकरसिंह वाघेला यांना फोडलं होतं. त्यावेळी गुजरातच्या राजकारणात नरेंद्र मोदी, केशुभाई आणि संजय जोशी यांचा दबदबा होता. हे तिघेजण आपली कोणतीही गोष्ट ऐकून घेत नसल्याचा आरोप करत वाघेला आपल्या 42 समर्थक आमदारांना घेऊन खजुराहोला निघून गेले. त्यावेळी सरकारला पाठिंबा देण्यासाठी वाघेला यांनी काही अटी समोर ठेवल्या. संजय जोशी आणि नरेंद्र मोदींना राज्याबाहेर पाठवून द्यावे. तसेच मुख्यमंत्री बदलावा, असे वाघेला यांनी म्हटले होते. भाजपानेही तेव्हाची परिस्थिती पाहून वाघेला यांच्या अटी मान्य केल्या. त्यानुसार केशूभाई पटेल जाऊन सुरेश मेहता मुख्यमंत्री झाले. तर नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीत रवानगी झाली. त्यानंतर 1996 च्या निवडणुकांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे गोध्रा लोकसभा मतदारसंघात वाघेला यांचा पराभव झाला. यावरून संतापलेल्या वाघेला यांनी तेव्हा थेट राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आता कर्नाटकचे राज्यपाल असणारे वजूभाई वाला त्यावेळी गुजरात भाजपाचे अध्यक्ष होते. तर एचडी देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान होते.वाघेला यांच्या अविश्वास ठरावानंतर गुजरातचे तत्कालीन राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा अहवाल केंद्राला पाठवला. या अहवालाची दखल घेत केंद्रानेही लगेचच गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष वजूभाई वाला आणि अन्य भाजपा नेत्यांनी जोरदार विरोध केला. या सर्वांनी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्याकडे धाव घेतली. मात्र, राष्ट्रपतींनी त्यांना पुन्हा राज्यपालांकडेच जायला सांगितले. काँग्रेस नेते दालनाबाहेर असताना राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी वाघेला यांना फोन करून तुम्ही लवकरात लवकर काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चिठ्ठी घेऊन या, असे सांगितले. अन्यथा मला सुरेश मेहता यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे लागेल, असे राज्यपालांनी वाघेलांना सांगितले. त्यानंतर वाघेला यांनी वेगवान हालचाली करत आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र राजभवनापर्यंत पोहोचवले. त्यावेळी काँग्रेसचे नेते राजभवनात उपस्थित असल्याने वाघेला यांचे समर्थक एका रुग्णवाहिकेतून राजभवनात आले होते. त्यांनी वाघेलांना समर्थन असल्याची चिठ्ठी राज्यपालांना दिली व त्याच रुग्णवाहिकेतून बाहेर निघून गेले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. परंतु, त्यावेळी कृष्णपाल सिंह यांनी उपस्थित काँग्रेस नेत्यांना अचानक माझ्याकडे सत्तास्थापनेसाठी शंकरसिंह वाघेला यांची चिठ्ठी अगोदर आल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बहुमतही आहे व त्यांनी आमदरांच्या समर्थनाचे पत्र सर्वप्रथम दाखल केल्याने आपण वाघेला यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत असल्याचा निर्णय राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी जाहीर केला. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना निराश होऊन परतावे लागले होते. अखेर 23 ऑक्टोबर 1996 रोजी भाजपाची सत्ता आली. त्यामुळे वजूभाई वाला यांची मेहनत फुकट गेली. परंतु, आज तेच वजूभाई वाला कर्नाटकचे राज्यपाल आहेत आणि त्यांच्याच हाती कर्नाटकची सूत्रे आहेत. त्यामुळे 22 वर्षांपूर्वी बहुमत असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तशीच वेळ आज काँग्रेसवर आली आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस