शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा मनमोहन सिंग बनले पाकिस्तानचे राष्ट्रपती

By admin | Updated: October 25, 2014 14:14 IST

पाकिस्तानमधील एका वाणिज्य संस्थेने एका सोहळ्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव छापल्याने एकच खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २५ - पाकिस्तानमधील एका वाणिज्य संस्थेने एका सोहळ्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव छापल्याने एकच खळबळ माजली आहे.  या वाणिज्य संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रवेशिकांवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ' पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मनमोहन सिंग ' असे नाव छापण्यात आले आहे. 
इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा (पीआयडीई)  दीक्षांत सोहळा येत्या २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसैन यांना आमंत्रित करण्यात येणार होते. मात्र त्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर हुसैन यांच्याऐवजी चुकून मनमोहन सिंग यांचे नाव छापले गेले, असे वृत्त दुनिया न्यूजने दिले आहे. तसेच या सोहळ्याची तारीखही चुकीची छापण्यात आली होती. २८ ऑक्टोबर ऐवजी २८ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडेल असे त्यात लिहीण्यात आले होते. 
ही चूक संबंधितांच्या लक्षात आली खरी, पण तोपर्यंत या पत्रिका अनेक मान्यवरांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर चूक सुधारून नवीन निमंत्रण पत्रिका छापून त्या निमंत्रितांकडे पाठवण्यात येतील.  मात्र संबंधित अधिका-यांनी त्यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.