शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

आदिवासींसाठी काय काम केले? यशवंत सिन्हा यांचा सवाल, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:03 AM

यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, टीएमसीचे अभिजित बॅनर्जी, सुखेंदू शेखर रॉय उपस्थित होते.

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी आदिवासी महिला उमेदवाराची निवड केली. अशा प्रतीकांची दवंडी पिटण्याऐवजी गेल्या आठ वर्षात आदिवासींसाठी काय काम केले, याची माहिती मोदी सरकारने जनतेला द्यावी, असे आव्हान विरोधकांचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी दिले.यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, टीएमसीचे अभिजित बॅनर्जी, सुखेंदू शेखर रॉय उपस्थित होते.यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढले.  ते म्हणाले, की लोकशाही ज्या स्तंभावर उभी आहे, ते स्तंभ ढासळू लागल्याने देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. ही लढाई केवळ राष्ट्रपतिपदासाठी नाही तर यापुढेही विरोधकांचे  ऐक्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सत्तारूढ पक्षातर्फे आदिवासी महिलेला उमेदवारी दिल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना सिन्हा म्हणाले, ही लढाई प्रतीकांची नाही. मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अनुसूचित जाती व जमातीसाठी काय केले, याची माहिती द्यावी. विरोधकांकडून याची संकलित केलेली माहिती लवकरच जनतेला उपलब्ध करून दिली आहे. केवळ प्रतीकांमुळे विकास होत नाही. त्यासाठी त्या समाजाच्या विकासाला कोणताही हातभार लागत नसल्याचेही यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते संपर्कातयावेळी बोलताना सिन्हा यांनी भाजपचे काही सदस्य आपल्या संपर्कात आहेत. राजकीय कारकिर्दीतील बराच  काळ व्यतीत झाला. यामुळे काही संबंध निश्चित आहे. या संबंधाचा मला फायदा मिळेल, असा दावा सिन्हा यांनी केला. यावेळी सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते.

टीआरएसची उपस्थिती महत्त्वाची तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. टी. रामा राव यांची यावेळी उपस्थिती होती आणि ती महत्वाची मानली जात आहे. २८ जूनपासून यशवंत सिन्हा हे तामिळनाडूतून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करु शकतात. पहिल्या टप्प्यात ते कर्नाटक व केरळचा दौरा करु शकतात.निवडणूक अभियान समितीची स्थापनसिन्हा यांच्या प्रचारासाठी ११ सदस्यीय निवडणूक अभियान समिती स्थापन केली आहे. यात काँग्रेसचे जयराम रमेश, द्रमुकचे तिरुची शिवा, तृणमूलचे सुखेंदु शेखर रॉय, माकपाचे सीताराम येचुरी, सपाचे रामगोपाल यादव, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, टीआरएसचे रंजीत रेड्डी, राजदचे मनोज झा, भाकपाचे डी. राजा आणि सुधींद्र कुलकर्णी यांचा यात समावेश आहे. शिवसेनेकडून एक सदस्य नियुक्त केला जाईल.  

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक