शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संदीप सिंह आणि भाजपाचे कनेक्शन काय?, CBI चौकशी करेल का?; काँग्रेसकडून सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 14:16 IST

"भारतीय दूतावास प्रायोजित मॉरिशस सहलीत एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग. तरीही..."

ठळक मुद्देभाजपा, बॉलिवूड, संदीप सिंह व ड्रग्ज नेक्सस यांचा काय संबंध आहे, याची चौकशी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी केली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या संदिप सिंह याचे भाजपाशी कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसकडून सतत विचारण्यात येत आहे. तसेच, एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची जबाबदारी भाजपाने कशी दिली, अशीही विचारणा करण्यात येत आहे.

याआधी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता. आज काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला आहे आणि विचारले आहे की, हे भाजपाचे कनेक्शन कोणत्या प्रकारचे असून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. "काय आहे, हा भाजपाचा संबंध? भाजपा कार्यालयात ५३ फोन, भारतीय दूतावास प्रायोजित मॉरिशस सहलीत एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग. तरीही पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट बनविण्याची जबाबदारी, व्हायब्रंट गुजरातमध्ये १७७ कोटींचा MOU, सीबीआय या संबंधांची चौकशी करेल का?," अशी विचारणा रणदीप सिंह सुजरेवाला यांनी केली आहे.

गेल्या शनिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शन संदर्भात नरेंद्र मोदींच्या बायोपीकचा निर्माता संदिप सिंहची चौकशी धक्कादायक असून सुशांत मृत्यू प्रकरणाशी भाजपाचे कनेक्शन काय, असा सवाल उपस्थित करुन मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत भाजपाने सीबीआय तपासासाठी एवढी तत्परता कोणाला वाचवण्यासाठी केली, असे गंभीर प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले होते.

संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा निर्माता आहे. हा चित्रपट २७ भाषेत बनवण्यात आला आहे आणि या चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामे बाजूला ठेवून हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये एवढे नामांकित निर्माते असताना संदीप सिंहच मोदींच्या बायोपीकसाठी कसा काय निवडला गेला. भाजपा, बॉलिवूड, संदीप सिंह व ड्रग्ज नेक्सस यांचा काय संबंध आहे, याची चौकशी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी केली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, संदीप सिंह एक चित्रपट निर्माता आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी पोहोचणाऱ्या व्यक्तींपैकी तो होते, असे त्याने दावा केला. संदीप सिंहला सुशांत आणि अंकिता लोखंडे यांचे मित्रही मानले जातात. अलीकडच्या काळात संदीप सिंहला अंकितासोबत पाहिले होते, पण तो सुशांतसोबत दिसला नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंहने सांगितले की, तो सुशांतचा मित्र होता. तसेच, संदीप सिंह हा सुशांतची बहीण मितू यांच्यासमवेत सुशांतच्या अंत्यसंस्कारात दिसला होता.

आणखी बातम्या...

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत