West Bengal: Son forced to pay Rs 51,000 to see father's body who died from coronavirus | लाजिरवाणा प्रसंग : कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलाकडून मागितले 51 हजार

लाजिरवाणा प्रसंग : कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलाकडून मागितले 51 हजार

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख 17,645 इतकी झाली आहे. त्यापैकी 15 लाख 36,259 रुग्ण बरे झाले आहेत, तर 44, 499 रुग्णांचे निधन झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत वाढताना दिसत असल्यानं चिंतेत भर पडली आहे, परंतु त्याचवेळी देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट अधिक आहे. कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केले जात असल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी कुटुंबीयांकडून  51 हजार मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पश्चिम बंगाल येथील हा प्रसंग आहे. हरि गुप्ता यांचे  शनिवारी मध्यरात्री कोरोनामुळे निधन झाले.  पण, खाजगी रुग्णालयानं त्यांना कळवलंही नाही. हरि गुप्ता यांचा मुलगा सागर यानं सांगितले की,''रविवारी दुपारी आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला आणि वडिलांचे मध्यरात्री निधन झाले असे त्यांनी सांगितले.  हे तेव्हाच का कळवले नाही, असे मी त्यांना विचारले. त्यावर त्यांनी तुमचा नंबर नसल्याचे कारण दिले.''

जेव्हा कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा त्यांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीय शिबपूर स्मशानभूमीत पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडून मृतदेह पाहण्यासाठी 51 हजार रुपये मागण्यात आले. कुटुंबीयांच्या विनंतीनंतर ही रक्कम 31 हजारांनी कमी करण्यात आली. तरीही कुटुंबीयांनी रक्कम देण्यात नकार दिला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले.  

पोलिसांचीही विनंती त्यांनी ऐकली नाही, असा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद करण्याचा कुटुंबीयातील काही सदस्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांचे फोनही हिस्कावून घेण्यात आले. अखेर मृतदेहाचे तोंड न पाहताच कुटुंबीयांना माघारी परतावे लागले. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र कुटुंबीयांच्या सदस्याचा फोननंबर न मिळाल्यानं मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आलाचा दावा केला. या विरोधार कुटंबीय पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना

विराट, रोहित अन् धोनीची लॉकडाऊनमध्ये हवा; जागतिक अभ्यासातून समोर आली मोठी आकडेवारी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: West Bengal: Son forced to pay Rs 51,000 to see father's body who died from coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.