शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालवर पहिला ओपिनिअन पोल आला! तृणमूल अन् भाजपमध्ये २ टक्क्यांचाच फरक, कोण जिंकू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:18 IST

West Bengal Polls Opinion Poll 2026, Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी MATRIZE-IANS चा ओपिनियन पोल जाहीर. टीएमसीला बहुमत पण भाजपचे तगडे आव्हान. पहा मतदानाच्या तारखा आणि सविस्तर आकडेवारी.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्तेच्या संघर्षात तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू ही लढत तेवढी सोपी नसणार आहे. एका टक्क्याचा जरी फरक पडला तरी ममता यांची सत्ता जाण्याची शक्यता दिसत आहे. 

ताज्या सर्वेक्षणानुसार आणि राजकीय विश्लेषणांनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या जवळ आहे. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेली टक्कर ममतांच्या चिंतेत भर टाकणारी ठरू शकते. IANS-Matrize चा ओपिनिअन पोल आला आहे. यानुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत केवळ दीड-दोन टक्के मतांचा फरक दिसत आहे. यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

ओपिनियन पोलचा कल आणि जागांचे समीकरणपश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांसाठी झालेल्या या सर्वेक्षणात टीएमसीला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता येईल, असा अंदाज आहे. टीएमसीला १५५ ते १७० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी झेप घेतली असून त्यांना १०० ते ११५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि अपक्ष अशा 'इतरांच्या' खात्यात केवळ ०५ ते ०७ जागा जाण्याची शक्यता आहे.

मतांची टक्केवारी आणि चुरसया निवडणुकीत टीएमसी आणि भाजपमधील मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ २ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षाला ४३ ते ४५% मते मिळू शकतात, तर भाजपला ४१ ते ४३% मते मिळण्याचा कल आहे. इतर पक्षांना १३ ते १५% मतांवर समाधान मानावे लागेल. ही अत्यंत कमी फरकाची लढत पाहता, ऐन निवडणुकीच्या वेळी कोणतीही लाट निकालांचे पारडे फिरवू शकते.

राजकीय विश्लेषणममता बॅनर्जी यांची 'लक्ष्मी भंडार' योजना आणि महिला मतदारांवरील त्यांची पकड टीएमसीसाठी जमेची बाजू ठरत आहे. मात्र, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक प्रचार केला असून उत्तर बंगालमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होताना दिसत आहे. २०११ मध्ये शून्य जागांवर असलेला भाजप २०२६ मध्ये १०० चा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जाणे, हा ममता बॅनर्जींसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

भाजपची मोठी झेप२०११ आणि २०१६ च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये शून्य असलेल्या भाजपने २०२१ मध्ये ७७ जागांपर्यंत मजल मारली होती, आता २०२६ च्या निवडणुकीत ही संख्या १०० च्या पार जाण्याचा अंदाज आहे. बंगालमधील पारंपारिक डावे पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी या शर्यतीत मागे पडल्याचे दिसत असून, मुख्य लढत ही टीएमसी विरुद्ध भाजप अशीच होताना दिसत आहे. भाजपने १०० जागांचा आकडा पार करण्याचा अंदाज असून, उत्तर बंगालमध्ये त्यांचे पारडे जड दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Opinion Poll: Close fight between TMC and BJP.

Web Summary : West Bengal opinion poll indicates a tight race. TMC likely to win, but BJP gaining ground. TMC projected 155-170 seats, BJP 100-115. The difference in vote share is minimal.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६