शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 2:04 PM

West Bengal : ममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाही

ठळक मुद्देममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाहीपश्चिम बंगालमधील मंत्र्यावर पेट्रोल बॉम्बनं करण्यात आला होता हल्ला

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परंतु त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मंत्री झाकिर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हा हल्ला म्हणजे कट असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयावरही आरोप केले. तसंच रेल्वे मंत्रालय आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या. जर रेल्वे स्थानकावर कोणावरही हल्ला झाला तर त्याच्यासाठी रेल्वे जबाबदार आहे. कारण याठिकाणी राज्याच्या पोलिसांकडे सुरक्षेचे अधिकार नाहीत, असंही त्या म्हणाल्या. "गेल्या काही महिन्यांपासून काही लोकं झाकिर हुसेन यांना आपल्या पक्षात येण्यासाठी दबाव टाकत आहेत. मी त्यांच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही," असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.मंत्र्यावर बॉम्बहल्लाममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हुसेन यांना तातडीने जंगीपूरमधील उपविभागीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमटिटा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, रुग्णालयानं झाकीर हुसेन यांची प्रकृती स्थिर असल्याचंही म्हटलं होतं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले मंत्री दिसत आहेत. तसंच या घटनेनंतर मंत्र्यांना कशाप्रकारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हेदेखील दिसत आहे.दरम्यान, पश्चिम बंगालमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी निषेध केला आहे. याबबत केलेल्या ट्वीटमध्ये विजयवर्गीय म्हणाले की, "झाकीर हुसेन यांच्यावर निमटिटा रेल्वेस्टेशनवर क्रूड बॉम्बच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. त्यांच्या प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी अशी प्रार्थना करतो," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीrailwayरेल्वेwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका