'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:32 IST2025-10-12T15:28:45+5:302025-10-12T15:32:30+5:30
West Bengal Crime: पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
West Bengal Crime:पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत. अशातच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावर बोलताना केलेल्या एका वाद वाढण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
रविवारी उत्तर बंगाल दौर्यावर रवाना होण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही घटना अतिशय भयावह आहे. पण, आता प्रश्न असा पडतो की, घटना घडली, तेव्हा कॉलेज प्रशासन कुठे होते? तरुणी रात्री एवढ्या उशिरा बाहेर कशी गेली? ती बाहेर काय करत होती? मुलींनी रात्री बाहेर पडू नये. कॉलेजनेही जबाबदारी घ्यावी लागेल, असे वक्तव्य ममता बॅनर्जींनी केले आहे. या वाक्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
#WATCH | Kolkata, WB: On the alleged gangrape of an MBBS student in Durgapur, CM Mamata Banerjee says, "... The girls should not be allowed to go outside (college) at night. They have to protect themselves also. There is a forest area. Police are searching all the people. Nobody… https://t.co/9cck7wwxcnpic.twitter.com/OnuFiFSIAz
— ANI (@ANI) October 12, 2025
तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले की, आम्ही पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. पोलीस सर्व संबंधितांची चौकशी करत आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल. मात्र, त्यांच्या “मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये” या विधानावर अनेक महिला संघटनांनी टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा वक्तव्यांनी पीडितांनाच दोषी ठरवण्याची प्रवृत्ती वाढते.
#WATCH | Kolkata, WB: On the alleged gangrape of an MBBS student in Durgapur, CM Mamata Banerjee says, "This is a private college. Three weeks ago, three girls were raped on the beach in Odisha. What action is being taken by the Odisha government?... The girl was studying in a… pic.twitter.com/ugQrQwNeW7
— ANI (@ANI) October 12, 2025
ममता बॅनर्जींची इतर राज्यांवर टीका
ममतांनी या संदर्भात ओडिशाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला की, तीन आठवडेपूर्वी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर तीन मुलींवर बलात्कार झाला होता. तिथे सरकार काय करतंय? आम्ही आमच्या राज्यात आरोपींवर एका-दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करून न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवली. मग इतर राज्यांनी असे का नाही केले? मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, अशा अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडतात, पण तिथल्या सरकारांची प्रतिक्रिया मंद असते. आम्ही मात्र तत्काळ कारवाई करतो.
नेमकी काय घटना घडली?
दुर्गापूरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत जेवायला बाहेर गेली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.