शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:15 IST

भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल.

कोलकाता - केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यांपैकी एक भवानीपूरची जागा आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनिवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल. कारण भाजप ममतांच्या विरोधात मोठ्या चेहऱ्यांवर डाव लावण्याचा विचार करत आहे. (West Bengal BJP decide candidate against cm mamata banerjee in bhabanipur bypoll)

माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपाकडून अभिनेत्याचे नेते झालेले रुद्रनील घोष, माजी राज्यपाल तथागत रॉय, टीएमसीचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी आणि भाजप नेते डॉ. अनिर्बन गांगुली यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक विचार होत आहे. ममता 2011 आणि 2016 च्या निवडणुकीत, भवानीपूरमधून विजयी झाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने भवानीपूर, समशेरगंज आणि जांगीपूर जागांवरील पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ममता बॅनर्जी भवानीपूरमधून, झाकीर हुसेन जांगीपूरमधून तर अमीरुल इस्लाम समशेरगंजमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

काँग्रेस आणि डाव्यांमध्येही उमेदवारांबाबत मंथन सुरू -यातच, काँग्रेसनेही सोमवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉंग्रेस पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर करेल अथवा डाव्यांसोबत आघाडीची घोषणा करेल. महत्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून रुद्रनिल घोष हे भाजपचे उमेदवार होते. मात्र, टीएमसीच्या सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर, सोहनदेब यांनी ममतांसाठी ही जागा खाली केली होती.

भवानीपूर जागेसाठी 30 सप्टेंबरला मतदान -निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला बंगालमध्ये पोटनिवडणूक होणार आहे आणि 3 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पश्चिम बंगालमधील 3 विधानसभा जागांसाठी 13 सप्टेंबरपर्यंत नामांकन केले जाईल. तर 16 सप्टेंबर ही नामांकन मागे घेतले शेवटची तारीख असेल.

"माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

ममतांची खुर्ची पणाला - ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टीकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक