Abhishek Banerjee : "माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:03 AM2021-09-06T11:03:54+5:302021-09-06T11:19:48+5:30

Mamata Banerjee And Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. 

ready to be hanged mamata banerjee nephew abhishek banerjee said on money laundering probe | Abhishek Banerjee : "माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

Abhishek Banerjee : "माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee ) आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. अभिषेक यांना 6 सप्टेंबर रोजी, तर रुजिरा यांना त्याआधीच 1 सप्टेंबर रोजी बँक खात्यांच्या तपशीलासह ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. आणखी तीन जणांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले. तसेच अभिषेक आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. याच दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. 

ईडीने याआधी 1 सप्टेंबरला रुजिरा बॅनर्जी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र दोन लहान मुलं असल्याने उपस्थित राहण्यास नकार देत त्यांनी कोलकातामधील आपल्या घरी चौकशी करावी अशी विनंती केली होती. याच दरम्यान दिल्लीला जाताना अभिषेक बॅनर्जी यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा 10 पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करू शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन" असं म्हटलं आहे. 

"भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही?"

"मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पण ते गोष्टी सार्वजनिक का करत नाही आहेत? कोलकातामधील प्रकरणासाठी मला दिल्लीत हजर राहण्याचं समन्स दिलं आहे" असा संताप अभिषेक यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख न करता भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही? असा सवाल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोळसा घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका कंपनीत अभिषेक यांचे वडील अमित बॅनर्जी हे संचालक आहेत. कोळसा घोटाळ्याचा तपास सीबीआय करीत आहे. गेल्या वर्षी 27 नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या कोलकता लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ईस्टर्न कोलफिल्डच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात अवैध खाणकाम केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. 

ED नं पुतण्याला समन्स बजावताच ममता भडकल्या

ईडीने पुतण्या अभिषेक बॅनर्जीला जारी केलेल्या समन्सवरून ममता भडकल्या आहेत. आपण यांना घाबरणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर तुम्ही आम्हाला ईडीची भीती दाखवली, तर आम्हीही भाजप नेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींना पुरावे पाठवू, असेही ममतांनी म्हटले आहे. तसेच 'भाजपा टीएमसी विरोधात सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांसाठी काम करणे ही आमची प्राथमिकता आहे. दिल्लीतील भाजप सरकार जेव्हा राजकारणात आमचा सामना करू शकत नाही, तेव्हा ते एजन्सीजचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत, कारण त्यांना माहीत आहे, की त्यांचे घर येथेच आहे' असं म्हटलं आहे. 

Web Title: ready to be hanged mamata banerjee nephew abhishek banerjee said on money laundering probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.