शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमध्ये 4 मिनिटांत अचानक घटलं मतदान! TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:56 AM

पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. (West Bengal Election)

ठळक मुद्देपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे.टीएमसीने निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या टक्केवारीत गडबड झाल्याचे म्हणत लेखी तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यांत भाजपवर मतदान प्रभावीत केल्याचा आरोप केला होता.

कोलकाता - पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र, यातच मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात तृणमूल काँग्रेसनेनिवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी अचानक कमी झाल्याने तृणमूल काँग्रेसने ही तक्रार केली आहे. (West Bengal assembly elections TMC compalaint to ec over voter turn out assembly elections 2021 phase 1 voting)

टीएमसीने निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या टक्केवारीत गडबड झाल्याचे म्हणत लेखी तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे, की कांठी दक्षिण (216) आणि कांठी उत्तर (213) मतदान केंद्रांवर सकाळी 9.13 वाजता मतदानाची  टक्केवारी प्रत्येकी 18.47% आणि 18.95% होती. मात्र, चार मिनिटांनंतर 9.17 वाजता ही टक्केवारी कमी होऊन 10.60% आणि 9:40 टक्क्यांवर आली आहे. ही गडबड आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी.

West Bengal Assembly Election: आज मतदानाचा ‘खेला होबे’; पहिल्या टप्प्यात ३० जागांचा समावेश; तृणमूल-भाजपमध्ये मुख्य लढत

यापूर्वी, तृणमूल काँग्रेसने झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यांत भाजपवर मतदान प्रभावीत केल्याचा आरोप केला होता. टीएमसीने झारग्राममधील बूथ क्रमांक 218 वर भाजप कार्यकर्त्यांनी ईव्हीएम खराब केल्यासंदर्भात आणि पश्चिम मेदिनीपूरच्या गारबेटा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 167 वर मतदारांना बूथमध्ये जाऊ न दिल्याचा आरोप केला होता. टीएमसीने आरोप केला आहे, की निवडणूक अधिकारीदेखील त्यांना सहकार्य करत आहेत.

तथापी, आज दुपारी 12 वाजता लोकसभेतील टीएमसी संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंद्योपाध्याय आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वात 10 खासदारांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची कोलकाता येथे भेट घेणार आहे.

बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात -पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 21 महिलादेखील आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकांत या 30 जागांपैकी 27 ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा